Type to search

maharashtra नंदुरबार

उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

Share
नंदुरबार । क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार तसेच एस.ए.मिशन हायस्कुल व ज्यु.कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 20 दिवशीय उन्हाळी प्रशिक्षण शिबिर एस.ए.मिशन हायस्कुल, नंदुरबार येथे घेण्यात आले आहे.

सदर उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये 80 ते 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरात त्यांना फुटबॉल, क्रिकेट, रोपस्किपिंग, फेन्सिंग, योगा, व्हॉलीबॉल, कराटे व किक बॉक्सिंग या खेळांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे रेव्ह.आर.के.वळवी, डॉ.राजेश वळवी, मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक डॉ.मधुकमल हिवाळे, पर्यवेक्षक पवार यांनी अभिनंदन केले.

सदर विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, संदिप ढाकणे, तालुका संयोजक मिनल वळवी, मुकेश बारी आदींचे सहकार्य लाभले.या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला महिला कोच म्हणून स्नेहल पाटील, निता मराठे, रक्षा तडवी, लिना पंडीत तसेच कल्पित नाईक, जगदिश जाधव, सनत झुंजारे, प्रतिक खंडेलवाल, नरेंद्र माळी, मोहित सोनवणे आदींनी काम पाहिले. शिबिराचे निरीक्षण ऑल नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!