खान्देश चेस अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

0
नंदुरबार । प्रतिनिधी-जैन स्पोर्टस अ‍ॅकेडमी व नंदुरबार जिल्हा बुध्दीबळ संघटनेतर्फे दि.20 व 21 ऑगस्ट रोजी मिशन हायस्कुलमधील जिमखान्यात खान्देश चेस अजिंक्यपद बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी 13 वर्ष आतील गटाकरीता 10 बक्षीसे व चषक ठेवण्यात आला असून या गटासाठी प्रवेश शुल्क 50 रूपये आहे.

तर खुल्या गटासाठी देखील या स्पर्धा होणार असून त्यात 10 बक्षीसे व चषक ठेवण्यात आले आहे. या गटातील प्रवेश फी 100 रूपये आहे. 9 वर्षा आतील गटासाठी तीन चषक व 15 वर्ष आतील गटासाठी दोन चषक ठेवण्यात येणार आहे.

एकूण 25 हजार रूपयांची रोख बक्षिसे या स्पर्धेत देण्यात येणार आहे. दि. 18 ऑगस्टपर्यंत स्पर्धकांनी नोंव नोंदणी करावी लेट फि 20 रूपये ठेवण्यात आली आहे.

अशी माहिती प्रा.सुभाष मोरावकर, राहुल खेडकर, संदिप साळुंके यांनी केली आहे. यावेळी मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*