आदिवासी विकास प्रकल्प तळोदाअंतर्गत क्रीडा स्पर्धांना सुरुवात
Share

मोदलपाडा –
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिर्वे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तळोदा प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते याहामोगी माता व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोळंकी यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्षावर मात करत जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांना जे ही कराल ते उत्कृष्ट करा असा मौलिक सल्ला दिला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी राज्यस्तरावर खेळलेल्या व सहभागी खेळाडुंना बक्षिस देवून कौतुक करण्यात आले.यावेळी खेळाडूंना क्रीडा शपथ दिलीप वळवी या विद्यार्थ्यांने दिली.
या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो खो,व्हॉलीबॉल, वैयक्तिक, रिले इत्यादी सांघिक व वैयक्तिक खेळ वयोगट 14,17 व 19 मध्ये घेण्यात येणार आहेत. यामध्ये तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या तिन तालुक्यातील गटस्तरिय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांंमधून विजयी संघ येथे दाखल झाले आहेत.
एकुण 1056 खेळाडू ,30क्रीडा शिक्षक,मदतनीस कर्मचारी यांच्या मेहनतीने या क्रीडा स्पर्धा पार पाडण्यात येतील. या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेश पटेल,संजय चौधरी, सुवर्णा सोळंकी, एन.डी.ढोले, मुख्याध्यापक ए.सी.पाटील, एस.के.गुरव,गावित,राजेंद्र पिंपळे,पी.एन.पाडवी,नियंत्रण समितीचे शरद सुर्यवंशी,जी.डी.दाभाडे,प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी, शिर्वे व.नाला आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच विविध समितीचे सदस्य क्रीडा शिक्षक परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के .टी.पाटील यांनी केले.