टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षेचा श्रॉफचा 100 टक्के निकाल

0
नंदुरबार । दि.23 । प्रतिनिधी-नंदुरबार। प्रतिनिधी- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृत परीक्षेचा निकाल नुकताच 100 टक्के निकाल लागला.
या प्रथम परीक्षेत भाग्यश्री ईश्वर चौधरी, मधुरा दिपक कुलकर्णी, देवश्री कपुरचंद मराठे, चिराग अश्विन खिवसरा यांनी 100 गुण मिळवून विद्यापीठात प्रथम स्थान प्राप्त केले व नेहा योगेश मराठे, अंजली अशोकसिंग रघुवंशी यांनी शाळेत द्वितीय आली.
दुसर्‍या परीक्षेत खुशी सुभाष मोटवानी हिने शाळेत प्रथम तर पुजा सुहास जोशी, दिशा जगदिश लोहार व गौरी प्रकाश मराठे यांनी द्वितीय स्थान मिळविले.

तृतीय परीक्षेत मेघज मिलींद पिंगळे व साक्षी विश्वास म्हत्रे यांनी शाळेत प्रथम तर दर्शन जितेंद्र जाधव व मेघना राजेंद्र माळी यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले.

त्याचप्रमाणे दहावीत परीक्षेचा संस्कृतचा निकाल 100 टक्के लागला असून विरल रविंद्र सोनार यांना 98 गुण प्राप्त करून संस्कृत विषयात शाळेत प्रथमस्थानी प्राप्त केले.

संस्थेचे चेअरमन अ‍ॅड.रमणभाई शाह, सेक्रेटरी डॉ.योगेशभाई देसाई, शाळेच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक नाना माळी, पर्यवेक्षक रविंद्र कोळी, सौ.विद्या सिसोदीया, भिकू त्रिवेदी यांनी मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत अध्यापक योगेश कोळी व भानुदास शास्त्री यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*