शहादा येथे वनमहोत्सव केंद्र उभारले

0
शहादा । ता.प्र.-महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ‘रोप आपल्या दारी’ हा उपक्रम शहादा तालुक्यात राबविण्यात आला.
त्याअन्वये शहादा शहरातील वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी शहरात दोन ठिकाणी वनमहोत्सव केंद्रे उभारण्यात आली आहेत.
या वनमहोत्सव केंद्रात वृक्षमित्रांची नियुक्ती करण्यात आली असून दि.25 ते 30 जूनदरम्यान रोपांची मागणी नोंदवून दि.1 ते 7 जुलैदरम्यान रोपे घरपोच पुरविले जाणार आहेत.

रहिवास भागात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शहरातील नगरपालिका शेजारील वनक्षेत्र कार्यालय व सुरभी हॉटेल जवळ असलेल्या या वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी एन.जी. पटले यांच्या हस्ते करण्यासत आले.

कार्यक्रमास सामाजिक वनीकरणाचे संचालक एस.आर. मोरे, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आर.के. चंदेल, शहाद्याचे वनक्षेत्रापाल ए.जे. पवार, तसेच शहादा वनक्षेत्रातील कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत निम, आवळा, सिताफळ, गुलमोहर, जामुन, हिरठा, पेहडा, शिसम, काशिद, बोर आदी रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रोपांच्या नोंदणीसाठी जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल ए.जे. पवार यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*