पोषण आहाराला बुरशी

0
शहादा । दि.20 । ता.प्र.-तालुक्यातील मामाचे मोहिदे येथील अंगणवाडील बालकांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणार्‍या पौष्टीक शेवाई पाकिटात बुरशीयुक्त शेवाळया निघाल्याने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ही बाब पं.स.सदस्यांच्या निदर्शनास आली आहे.त्यामुळे या पाकिटांचे वाटप करण्यात येवू नये व पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत दोन भागातील अंगणवाडी वर्गातील मुलांना महिन्यासाठी पोषण आहार दिला जातो.
मामाचे मोहिदे येथे अंगणवाडीत पौष्टीक शेवाईचे पाकीट मॅगी म्हणून विद्यार्थ्यांना सकाळी दिले जाते. पं.स. सदस्य ओंकार सुभाष पाटील यांनी ही पाकिटे तपासली असता बुरशीयुक्त शेवाई आढळून आली.
दोन चार नव्हे तर दहा पाकिटे फोडली तरी सर्वच पाकिटांमध्ये बुरशी आढळून आली आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग शहादा व म्हसावद असे आहेत.

शहादाअंर्तत 188 अंगणवाडीत सहा हजार 63 बालके तर म्हसावद अंतर्गत 266 अंगणवाडीत 9 हजार 273 बालके आहेत.

या बालकांना महिन्यातील 25 दिवसांसाठी दोन वेळा प्रति दिवस 130 ग्रॅम वजनाचा पोषण आहार दिला जातो. राज्य शासाच्या वतीने महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योग संस्था मर्यादीत बाळापूर शिवार फागणे (जि.धुळे) युनिट गट नं. 116 येथून अंगणवाडया मुलांना आहारासाठी पौष्टीक शेवाईचे मॅगी पाकीट घेतले आहेत.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून या शेवाई पाकिटाचे वाटप अंगणवाडया शाळेत झाले आहेत. दि.19 जून रोजी मोहिदा येथील अंगणवाडीच्या बालकांना पोषण आहार दिला जात होता.

तेव्हा पौष्टीक शेवाईचे मॅगी पाकिटात बुरशीयुक्त शेवाईच्या भुगा चक्क आठ दहा पाकिटात सारखी परिस्थिती दिसून आली. सहा महिने ते तीन वर्षाआतील मुलांना बुरशीयुक्त शेवाई दिल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहादा पं.स. सभापती दरबारसिंह पवार, उपसभापती सिमा पाटील, जागृत पालक हरी पाटील यांनी शेवाईच्या पाकिटात बुरशी लागलेली शेवाई तपासली असात त्यात भुगा होता व त्याची दुर्गंधी येत होती. मुक जनावरांनी खाल्यावर देखील त्यांना त्रास होईल.

एवढी खराब शेवाईचे पाकिट आहेत. तालुक्यातील अंगणवाडी शाळांना पुरवठा झालेल्या पौष्टीक शेवाई पाकिटे त्वरीत परत मागवा संबंधित संस्थेस दिलेला ठेका रद्द करा व ठेकेदारांची चौकशी व्हावी, असे पं.स. सभारती दरबारसिंह पवार यांनी केली आहे.

अंगणवाडया मुलांना दिला जाणारा आहारात पौष्टीक शेवाईच्या पाकिटात बुरशीयुक्त शेवाईने मुलांचे आरोग्य धोक्यात आले अंगणवाडी बालकांना निकृष्ठ आहार पुरवठा करणार्‍या संस्थेचा ठेका रद्द करून ठेकेदाराची चौकशी व्हावी, अशी मागणी दरबारसिंग पवार यांनी केली आहे.

याबाबत अंगणवाडी बालकांचा आहार पौष्टीक शेवाई पाकिटांची तपासणी केली जाईल. बुरशीयुक्त शेवाई पाकिट बनविणार्‍या संस्थेस नोटीस व ठेकेदाराची चौकशी करणार मुलांना त्वरीत दुसरा आहार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*