Type to search

नंदुरबार

राज्यातील पहिल्या मतदान केंद्रावर केवळ 1 मतदान

Share

शहादा/नंदुरबार । राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील मणिबेली या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. या गावात वीज, पाणी आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत पोहोचल्या नसल्याने गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला. या गावातील 328 पैकी केवळ एका मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित उर्वरित 327 मतदारांनी बहिष्कार कायम ठेवला.

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचे गाव मणिबेली हे आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विज, पाणी व आरोग्य अशा मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याबाबत गावकर्‍यांनी प्रशासनाला तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना करून निवेदन देऊन तसेच आंदोलन करूनही अद्यापपर्यंत हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे या गावकर्‍यांनी विधानसभा मतदार मतदानावर बहिष्कार घातला.

याबाबत सकाळी 9:30 वाजता प्रशासनाला शासकीय व्हाट्सअप ग्रुप वर माहिती कळली होती. परंतु तरीही ही प्रशासनातील एकही अधिकारी या गावकर्‍यांचे प्रश्न सोडवायला किंवा त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यासाठी गेला नसल्यामुळे गावकर्‍यांनी सरळ मतदानावर बहिष्कार घातला. या गावात 328 मतदार आहेत. त्यापैकी सहदेव तडवी या एकमेव मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित 327 मतदारांनी मतदान केले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!