Type to search

नंदुरबार

शहादेकरांना लागली गणरायाच्या आगमनाची चाहूल

Share

नरेंद्र बागले
शहादा | येत्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत असल्याने शहरासह तालुक्यात गणेश भक्तांमध्ये लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली आहे.

शहरात ३५ मंडळे परवानाधारक तर ग्रामीण भागात ३६ मंडळे परवानाधारक आहेत. ग्रामीण भागात एक गाव एक गणपती अशी चार गावे आहेत. चार दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने शहरासह ग्रमीण भागातील सर्वच मंडळाचे गणेशभक्त आरास बनविण्यात व्यस्त आहेत. ग्रामिण व शहरी भागात कही खुशी कही गम सारखी स्थिती पहावयास मिळत आहे. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कारण पावसाने गेल्या चार वर्षाचा बॅकलॉग यंदा भरून काढला आहे. त्यामुळे गणेशभक्तही मोठ्या जोमाने गणपतीच्या आरास सजावटीत साहित्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. मात्र, ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे नदीनाले ओहरफ्लो झाले होते. नदीनाल्याचे पाणी व संततधार पावसाने जवळपास ५० टक्के खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याने. काहीअंशी नाराजीचे चित्र दिसत आहे. मात्र गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. खरीप हंगाम गेला. पण खरीपाची भर रब्बीत येईल या अनुषंगाने ग्रामीण भागातही गणपतीची आरस मोठ्या जोमाने सूरू आहे. मंडळाचे भक्त साहित्य जुळवण्यात व्यस्त आहेत. तालुक्यातील चार गावातील गणेश भक्तांनी एक गाव एक गणपती स्थापन करण्याचे ठरवले आहे. बालगोपालांकडूनही गणेशाची आरास सजावट सुरू आहे.

शहरात लहान मोठे गणपती विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत.घरघुती गणेश स्थापनाकरणारे भक्तगण यावर्षी शाडूमातीच्या गणेशमुर्ती पसंतीला प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणेशमूर्ती बनवणे, रंगकाम करणे आदी कामावर कुंभार मूर्तिकार त्यांच्या कुटुंबीयांसह मग्न झाले आहेत. सार्वजनिक नोंदणीकृत तरुण मंडळाच्या गणेशमूर्तींची जवळपास १०० टक्के कामे कारागिरांनी पूर्ण केली आहेत. त्याचदरम्यान गौरीशंकर यांचे मुखवटे बनविण्याच्या कामाला गती येऊ लागली आहे. मूर्तीकारांची मुर्ती बनवण्याची कामे रात्रंदिवस सुरू आहेत. शाडूच्या मूर्तींना ग्रामीण भागात नव्या बदलत्या काळात गणेशभक्तांकडून मागणी आहे.

दर्जेदार कलात्मक गणेशमूर्तीनिर्मितीचे काम श्री मोरीया आर्टस्च्या माध्यमातून सुरू आहे. मोरीया आर्टस्तर्फे सजावट केलेल्या मूर्ती, मुख्यवट्यांना मोठी मागणी आहे. सजावट केलेले ३५ तरुण मंडळांच्या व लहान ४०० गणेशमूर्ती व गौरीचे मुखवटे दरवर्षी मागणीनुसार दिल्या जातात. गेल्या काही वर्षापासून मोरीया आर्टस्चा कारभार वाढला आहे. वर्षाला ४०० ते ५०० गणेशमूर्तींची सजावट व रंगकाम या ठिकाणी केले जाते. हा व्यवसाय सहा महिने सुरू असतो. मूर्ती सजावटीमध्ये कुटुंबातील सर्वच व बाहेरील सहा कामगार पूर्णवेळ काम करतात. स्वत: डिझाईन व सजावट काम पाहणे व सर्वांना कामे वाटून दिली जातात. तसेच त्यावर झालेली मूर्ती सजावटी स्वत: पाहूनच नंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाते. इतर महत्त्वाच्या जबाबदार्‍या कुटुंबातील मंडळी पार पडतात, तर काही मंडळीही विक्रीचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. विविध प्रकारचे साहित्य वापरून मूर्तीची सजावट केली जाते. मूर्ती जितकी मोठी त्यावर जेवढी सजावट केली असेल त्याप्रमाणे दर ठरतो. साधारण ४०० रुपयापासून मूर्तीच्या किमती सुरू होतात, मोठी मूर्ती किमान पंचवीस हजारापर्यंत विकली जाते. यावर्षी कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्याने मुर्तीच्या किमतीत सुद्धा वाढ करावी लागली. यंदा पीक पाणी चांगले होते. परंतु अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आणि संततधार पावसामुळे यंदा मुर्ती उद्योगावर परीणाम झाला. परीणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ७० टक्केच मागणी असल्याचे असे मुर्तीकारांकडून सांगितले जात आहे.

इको फ्रेंडली कलर वापरण्याकडेही अनेकांचा कल आहे, दगडुशेठ, लालबागचा राजा, बालहनुमान शिवबा, श्रीराम, जय मल्हार यासह अनेक देवदेवतांच्या अवतारात मुर्ती साकारण्यात आल्या आहेत.आता बाजारात वेगवेळ्या आकाराच्या गणेश मुर्तींचे आगमन झाल्याने शहरात गणपती उत्सवाची चाहूल जाणवू लागली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!