शहादा येथे वरघोडा मिरवणूक

महावीर भगवान जन्म कल्याणक महोत्सवनिमित्ताने आयोजन

0
शहादा । ता.प्र.- शांतीचे महानायक महावीर भगवान जन्म कल्याणक महोत्सव निमित्ताने शहरातील श्री कुंथूनाथ जैन मंदिर येथून आज सकाळी वरघोडा मिरवणूक आयोजित करण्यात आलेली होती. जय महावीर नामाच्या जय जयकार करत वर घोडा मिरवणूक गावातील मंदिर येथे येऊन विसर्जित झाली.

भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त आज शहरातील जैन धर्मियांच्या विविध संघटनेमार्फत विश्वशांतीचे महानायक महावीर भगवान जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त वर घोडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वशांतीचे महानायक महावीर भगवान यांचे शहरातील जुनी पोस्ट गल्लीत असलेल्या कुंथूनाथ जैन मंदिर येथे भगवानाची मूर्ती चे जैन धर्मियांकडून विधिवत पूजाअर्चा करत भगवान महावीर यांच्या मूर्ती वरघोडा रथावर विराजमान करत मिरवणूक सवाद्य शहरातील हुतात्मा लालदास चौक, महात्मा गांधी चौक,गुजर गल्ली, जुना प्रकाशा रोड,जनता चौक महात्मा गांधी पुतळा वळसा घालून येत्या चार वाजता रस्ता मेन रोड, काजी चौक, तू बाजार करतात मिरवणूक कुंथूनाठ मंदिर येथे येऊन विसर्जित करण्यात आलेली आहे.

मंदिर येथे वर घोडा मिरवणूक विसर्जित झालेली आहे. या मिरवणुकी दरम्यान ठिकाणी जैन बांधवांनी कुटुंबासह श्री महावीर भगवान च्या मूर्तीची पूजाअर्चा करण्यात आलेली आहे महिलांनी गरबा नृत्य सादर केले जय महावीर जय भगवान नामाच्या जय जय कार घुमत होता. भगवान महावीर यांच्या जन्मोत्सव कल्याणक वर घोडा मिरवणूक शहादे शहरातील सर्वच धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित या निमित्ताने आज सकाळी साधुमार्गी जैन संघाच्या वतीने समता भवन येथे नवकार महामंत्र जपान आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*