Type to search

नंदुरबार

शहाद्यात प्रथमच जगन्नाथ रथयात्रा

Share

शहादा । ता.प्र.- येथे पहिल्यांदाच नारायण भक्तिपंथाद्बारे भगवान जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीक्षेत्र नारायणपुरम शहादा या ठिकाणी भगवान जगन्नाथचे मंदिर उभारले जात आहे. यापुर्वी संत लोकेशानंद महाराजांची भागवत कथा पुराणाचा कार्यक्रमदेखील या पवित्र भुमित झाला होता. काल गुरुवारी सकाळी 10.30 वाजता शहरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून नारायण भक्त परिवाराकडून श्री भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचे आयोजन शहरात प्रथमच होत आहे. रथयात्रेचे महत्व मोठे असल्याने भाविकांसह नागरिकांमध्येदेखील उत्साह होता. महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. रथ ओढण्यासाठीदेखील महिलांनी सहभाग घेतला.

रथयात्रेते भाविक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रा सप्तशृंगी मंदिर, स्टेट बँक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, नगरपालिका वळसा घालून, डोंगरगाव रोड, दादावाडी या मार्गाने श्री क्षेत्र नारायणपुरम येथे त्याची सांगता करण्यात आली. रथयात्रेचे पहिल्यांदाच आयोजन झाल्याने रस्त्यावर रथयात्रा पाहणार्‍याची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचे दर्शन घेवुन भाविक मंत्र मुग्ध झाले होते. या रथयात्रेमुळे शहरात चैतन्याचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!