अजित पवार, सुनील तटकरे 14 ला शहाद्यात

0
शहादा । ता.प्र.-शहादा तालुका राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकत्यांचा मेळावा जिल्हा अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
येत्या 14 जुलै रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व आ.अजित पवार हे नंदुरबार दौर्‍यावर येणार असून कार्यकर्त्यांनी मान्यवराचा दौरा यशस्वी करुन मोठ्या संखेने उपस्थित रहाण्याचे आवाहन राजेंद्रकुमार गावीत यांनी मेळाव्यात केले.

यावेळी पं. स सभापती दरबारसिग पवार, जिल्हा सरचिटणीस अनिल भामरे, युवा अध्यक्ष डॉ.आनंद पाटील, पं.स.सदस्य बाबुराव पवार, भाईदास बागले, कैलास वसावे, शिवाजी मालचे, नगरसेवक इकबाल शे. सलीम, युवा उपाध्यक्ष मंगेश सुळे, विजय मोरे, धरमसिंग पावरा, ईश्वर पटले, सुभाष पटले, जगदीश पाटील, ए आर.अंतुले, रतिलाल पवार, विजयसिंग गिरासे आदी उपस्थित होते .

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व आ.अजीत पवार नंदुरबार जिल्ह्याचा दौर्‍यावर येत असून 13 जुलैला नंदुरबार मुक्काम, 14 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 जिल्हा प्रभारी व निरीक्षक जिल्ह्यातील आजी माजी प्रमुख नेते व स्थानिक स्वराज संस्थतील पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा घेवून पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शनपर मेळाव्याला संबोधीत करणार आहेत .

सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*