शहादा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चार विषय नामंजूर

0
शहादा । दि.29 । ता.प्र.-घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला मुदतवाढ देणे, पाटचारी व नालेसफाई झालेल्या कामास मंजूरी देणे या विषयांसह चार विषयांना आज झालेल्या पालिकेच्या सभेत नामंजूर करण्यात आले.
स्वच्छता तथा आरोग्य व दिवाबत्ती विभागाला स्वतंत्र दालन मिळाले पाहिजे, अशी मागणीही सभेत करण्यात आली.
58 विषयांसाठी येथील पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
उपनगराध्यक्षा सौ.रेखा चौधरी, मुख्याध्याकारी डॉ.सुधीर गवळी व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते.

सभेत रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नगरसेविका योगिता वाल्हे यांनी रस्त्यांच्या चांगल्या दर्जाबाबत हमीपत्र का घेतले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करीत सध्या पावसाळ्याचे दिवस असून जंतू नाशकाची फवरणीकरण्याबाबत आरोग्य विभागाला धारेवर धरले.

प्रा.मकरंद पाटील यांनी ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत प्रत्येक ठेकेदाराने कामाच्या माहिती दर्शविणारे फलक लावले पाहिजे व त्यांचे मोबाईल क्रमांकही नागरीकांना दिले पाहिजे. जेणेकरून नित्कृष्ठ कामांबाबत तक्रार करणे शक्य होईल, अशी सूचना मांडली.

नागरीकांचा महत्वाचा प्रश्न असलेला आरोग्य विभाग व दिवाबत्ती विभागाला स्वतंत्र दालन देण्याची मागणी प्रशांत निकुंभ यांनी केली.

कारण, या विभागाला दालन राहिल्यास नागरीकांना थेट तक्रार करता येवू शकते. याशिवाय अजेंडा उशिरा देणे, सोबत टिपणी न देणे यावरही गरमागरम चर्चा झाली.

सभेत 58 विषयांपैकी घनकचरा ठक्यास मुदतवाढ देणे, नाले व पाटचारी सफाई झालेल्या कामास मंजूरी देणे यासह चार विषयांना नामंजूर करण्यात येवून उर्वरीत विषयांना मंजूरी देण्यात आली.

सभेत सर्व नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*