शासकीय विश्रामगृह की दारूचा अड्डा ?

0
शहादा । दि.06 । ता.प्र.-येथील शासकीय विश्रामगृहात दारु-बियरच्या बाटल्यांचा ढिग जमा झाला आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृह आहे की दारुचा अड्डा असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य इमारतीस लागूनच शासकीय विश्रामगृह आहे. यात सह्याद्री नावाच्या वास्तूत दोन खोल्या आहेत.
त्यात एक व्ही.आय.पी. असून ती मंत्री-आमदार-खासदार व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी आहे. त्याला लागून बैठक व्यवस्था व एक खोली आहे.
त्यात प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांना देण्यात येते. या खोलीच्या मागे भोजनगृह आहे. या खोलीस लागून बैठक रूममध्ये अनेक वेळा काही लोक दारू-बियरच्या बॉटल्स आणून नशा करीत बॉटल्स तेथेच सोडून किंवा खोलीच्या बाहेर खिडकीतून फेकतात.

याठिकाणी बाहेर फेकलेल्या बॉटल्स व इतर स्वच्छता कोणी करावी हादेखील प्रश्न गंभीर आहे. विश्रामगृहाबाहेर ट्युबर, किंगफिशर, नावाच्या बियर बॉटल्स, डब्बे, ओ.सी.ब्ल्यू., रॉयल्स चॅलेंज नावाच्या महागड्या नशेच्या दारूची बॉटल्स एक दोन नव्हे तर मोठ्या संख्येने पडलेल्या आहेत.

शासकीय विश्रामगृह हे प्रशासकीय सेवेतील अधिकारी-लोकप्रतिनिधींंना विश्रांतीकरीता आहे, की अज्ञात लोकांना दारू-बियर पिण्यासाठीचा अड्डा आहे, असा सूर जनतेतून निघत आहे.

लोकांनी दारूची नशा तर केली परंतू त्या बाटल्या तेथेच का सोडून गेलेत? त्यांना सांगणारा वाली कोणी नाही का? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या परिसराची स्वच्छता कर्मचारी नाही का? बांधकाम विभागातील कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता यांना तोंडी कळवूनदेखील ते या घटनेकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.

शासकीय विश्रामगृहातील बैठक व्यवस्थेतील खुर्च्या दारूने खराब झाल्याने त्यातून दुर्गंधी येते. वातानुकुलीत खोलीमध्ये गरमी होत असून भोजनालयातील फ्रिजची दूरवस्था झाली आहे.

तालुका बाहेरगावाहून काही अज्ञात युवक विश्रामगृहात येवून तेथील कर्मचार्‍यांना दमदाटी करीत तेथे नशा करतात. त्या कर्मचार्‍यांना संरक्षण कोण देणार? या विश्रामगृहाची संरक्षणाची जबाबदार अधिकार्‍यांनी या घटनेची चौकशी करावी व नशा करणार्‍या लोकांना शासकीय विश्रामगृह वापरण्यासाठी देवू नये, अशी मागणी होत आहे.

शासकीय विश्रामगृहातील कक्ष आरक्षित करतांना संबंधीत व्यक्तींकडून ओळखपत्र किंवा काही तरी ओळख घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

 

LEAVE A REPLY

*