शहादा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
शहादा ।  ता.प्र.- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विविध संघटनाचे प्रतिनिधीसह समाज बांधवानी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सामूहिक बुध्ध वंदनेचे पठन केले.दरम्यान सायंकाळी 5 वाजता सिध्दार्थ नगर, संभाजी नगर, डॉ आंबेडकर चौक, नागसेन नगर या परिसरातुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य चित्रासह विविध देखावे करुन डिजे, ढोल ताशांच्या गजरात प्रमुख मार्गाने मिरवणुका काढण्यात आल्यात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आज रोजी सकाळी 9:30 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादनास सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,नगरसेवक प्रा.मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत,उपनगराध्यक्षा रेखाबाई चधरी ,नगरसेेेेविका उषाबाई कुवर, यशवंत चौधरी, अजय शर्मा, जि प. सदस्य अभिजित पाटिल , लड्डूभाई पाटील, मनलेश जायसवाल, सुपडू खेडकर,बापूजी जगदेव, अरविंद कुवर,शशिकांत कुवर ,अनिल कुवर ,कॉ सुनिल गायकवाड ,मुनेश जगदेव , सुरेद्र कुवर. ,सुुुनिल सिरसाठ , अशोक कुवर , दादाभाई पिंपळे , नरेद्र महिरे आदीसह समाज बांधव व महिला मोठ्या संंंख्येने उपस्थित होते.

सिध्दार्थ नगर कुकडेल येथे 14 किलोचा केक
स्ध्दिार्थनगर कुकडेल परिसरात रात्री 12 वाजता 14 किलोचा केक कापून बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा केला.दरम्यान महिला ंसाठी संगीत खुर्ची सह विविध कार्यक्रम घेतले.14 एप्रिल रोजी सकाळी प्रभात फेरी , जयंती उत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. पंचशील परिसर, शिक्षक कॉलनी व प्रशिक मंडळ परिसरात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व पंचशील ध्वजाचे रोहन सदर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

निराधार महिलांना शिलाई मशिनचे वाटप
रामरुख्मीनी प्रतिष्ठान शहादा आणि प्रशिक बहुउद्देशिय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने परित्यक्त्या आणि निराधार अशा दहा गरजू महिलांना स्वयं रोजगारासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. पंचशिल गृहनिर्माण संस्था शहादाचे संस्थापक रामदास गोविंद बिर्‍हाडे यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीदिनी हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कॉ. ईश्वर पाटील, प्रा. मनोज गायकवाड, कॉ. सुनिल गायकवाड, मुनेश जगदेव, सुुुनिल सिरसाठ, दादाभाई पिंळे नरेद्र महिरे, नरेद्र कुवर, किरण मोहिते आदी मान्यवरांसह समाज बांधव व महिला मोठ्या संंंख्येने उपस्थित होते. डॉ. ज्ञानदेव बिराडे, नरोत्तम बिर्‍हाड़े यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहादा तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात घोषणा देत मानवंदना देण्यात आली.

दरम्यान सायंकाळी 5 वाजता सिध्दार्थ नगर, संभाजी नगर, डॉ आंबेडकर चौक, नागसेननगर या परिसरातुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमेची विविध देखावे करुन डिजे, ढोल ताशांच्या गजरात प्रमुख मार्गाने मिरवणुका काढण्यात आल्या यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या बुध्दवंदनेस मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*