शहादा येथे वीज वितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण

0
नंदुरबार । शहादा शहरातील हरीओम नगरमध्ये वीज बिल न भरल्याने घराचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील हरिओम नगरमधील रहिवासी मनोहर हरीचंद्र इदाहत यांच्या घराचे लाईट बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी विज वितरण कंपनीचे कर्मचारी स्वप्निल निंबा बागले गेले असता त्यांना इदाहत यांनी तसेच बागले यांना शिवीगाळ करीत विटेने मारहाण केली तसेच त्यांचे साथीदार राजेंद्र ओेंकार खैरनार यांना लाकडी डेंगार्‍याने मारहाण केली. याप्रकरणी स्वप्निल निंबा बागले रा.म्हसावद ता. शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर हरिचंद्र इदाहत रा.हरिओमनगर (शहादा) याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

*