शहादा दंगलप्रकरणी मुख्य संशयितास अटक

0

शहादा । दि.12 । ता.प्र.-येथील गरीब नवाज परिसरात दोन महिन्यापुर्वी पाण्याच्या टँकरवरून झालेल्या हाणामारीत एकाची हत्या होऊन दोन जण जखमी झाले होते.

या घटनेस कारणीभुत असलेल्या कलम 307 गुन्हयातील फरार आरोपी शेख मेहमुद शेख अहेमद यास नंदुरबार गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी अटक केली.

शहरातील गरीब नवाज कॉलनीत दोन महिन्यांपुर्वी पाण्याची भीषण समस्या होती. या वसाहतीत पाणी वाटप करण्यासाठी आलेल्या टँकरवरून माजी नगरसेवक शेख मेहमुद शेख अहमद उर्फ मुन्नाभाई आणि नगरसेविकापुत्र मुजफ्फर अली लियाकतअली उर्फ मुज्जु आणि सैय्यद नासिर लियाकत अली या दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटातील हे तिघेही गंभीर जखमी झाले होते.

याच घटनेत एका नगरसेवकाचा खून झाला होता. सदर घटनेस कारणीभूत मुन्नाशेख वैद्यकीय उपचारानंतर फरार झाला होता.

त्याच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल होता. या घटनेत कलम 307 व 302 अन्वये दाखल गुन्हातील शेख परिवारातील सात आरोपी अटकेत आहेत.

तर 395 व 353 कलमान्वये अन्य सात आरोपी देखील न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. कलम 302 च्या गुन्हातील आरोपींची जामिन अर्जाची सुनावणी नंदुरबार सत्रन्यायालयात शुक्रवारी होती.

त्यावेळी शेख मेहमुद उर्फ मुन्ना न्यायालय परिसरात येताच गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीष पाटील व त्यांच्या पथकाने अटक केली.

 

 

LEAVE A REPLY

*