Type to search

बनावट दारु विकण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

maharashtra नंदुरबार

बनावट दारु विकण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

Share
नंदुरबार । शहादा तालुक्यातील मलोणी शिवारातील बनावट दारू कंपनीच्या असल्याचे सांगून विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलोणी शिवारातील मोकळया जागेत आरोपी याने संगनमताने सीग्रॅम्स इम्पेरीयल ब्लु या कंपनीची आहे. असे भासवून विण्याचा उद्देशाने बनावट दारू ही इम्पेरीयल ब्ल या कंपनीतच तयार झालेली आहे. असे भासवण्याचा प्रयत्न करून कंपनीची तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देशाने असतांना त्यांना पोलीसांनी पकडले. त्यांच्याकडून एक लाख 6 हजार 952 रूपये किंमतीची 852 दारूच्या रिकाम्या बाटल्या, टाटा सुमो (एम.एच.18- पी. 0783) आदी माल मिळून आला.

याप्रकरणी पोहेकॉ जलालोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक वसंत देवरे रा. गणेश नगर शहादा, साजिद शेख उर्फ कालू रा.खेतीयारोड शहादा यांच्या विरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. सरदार करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!