बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याने नाराजी

0
मंदाणे ता. शहादा । दि.03 । वार्ताहर-शहादा तालुक्यातील मंदाणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ज्येष्ठ नागरिक व ग्राहकांना योग्य ते प्रकारे सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे तसेच ज्येष्ठ नागरीकांचे हाल होत आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र च्या मंदाणे शाखेत कर्मचार्‍यांची अपुरी संख्या असल्यामुळे व बँकेच्या लहान जागा असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना तसेच विधवा मातांना पेन्शन घेण्यासाठी तासनतास थांबून उभे रहावे लागते.

तसेच बँक महाराष्ट्र येथे शाखेत 12 ते 15 खेडयाचे केंद्र बिंदू असून 20 ते 25 पर्यंत लोकांचे खाती नंबर असून विविध योजनाचे लाभार्थी आणि पेन्शनाची खाते या बँकेत उघडले आहे.

महिन्याच्या 1 ते 10 या तारखेपर्यंत याठिकाणी पैसे काढण्यासाठी सेवानिवृत्त ग्राहक येतात. दोन तीन दिवस गर्दी नेहमी वाढत असते.

या ज्येष्ठ नागरीकांचे व वृध्दापकाळ पेन्शन सेवा देण्यासाठी बँकेचे एक अधिकारी व एक लिपीक वर्गीय तसेच एक शिपाई कर्मचारी म्हणून आहेत.

परंतु या बँकेला तीन लाख रूपये वाटपासाठी देण्यात येत असल्याने ते पैसे पुरत नाहीत. म्हणून ज्येष्ठ नागरीक व विधवा माता पेन्शनर यांना रिकाम्या हाताने घरी जावे लागते या प्रकाराने बँकेत नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच एटीएम नेहमी बंद असते.

याठिकाणी नियुक्त शाखाधिकारी 11.30 ते 11.45 वाजता येत असल्याने तोपर्यंत ज्येष्ठ नागरीक बाहेर बसून रहात असल्याचे दिसून येत आहे व शाखाधिकारी पेक्षा शिपाई मोठया आवाजाने ग्राहकांना सल्ला देत असतो. मॅनेजरपेक्षा शिपाई उपयोगी पडत असल्याने त्याचे कौतुक ग्राहकांना वाटत आहे.

 

LEAVE A REPLY

*