शहादा पालिकेतर्फे भाजी मार्केटमधील अतिक्रमणावर हातोडा

0
शहादा । ता.प्र. – ग्राहकांची डोकेदुखी ठरलेल्या शहरातील भाजीमार्केट परिसरातील अतिक्रमणावर अखेर पालिकेने हातोडा चालवला. पोलिसांच्या बंदोबस्तात रिमझिम पावसात या मार्केटमधील गाळेधारकांचे कच्चे व पक्के अतिक्रमणे पालिका प्रशासनाने हटविले आहेत. दरम्यान, भाजपा महिला मोर्चाने भाजीमार्केटमधील अतिक्रमणाबाबत एल्गार पुकारला होता.

शहरातील वाढती अतिक्रमणे व हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर पायी चालणेही जिकीरीचे झाले होते. त्यातच सर्वाधिक समस्यांनी वेढलेल्या भाजीमार्केटमधील अतिक्रमणामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या मार्केटमध्ये शंभर ते दीडशे गाळेधारक आहेत.

त्यांनी गाळ्याच्यापुढेच दुकाने थाटून पत्र्याचे शेड व रस्त्यालगत मोठ्या पायर्‍या आणि वीट बांधकाम करून भाजीमार्केटमधील रहदारीला अडथळा ठरणारी कच्चे व पक्के स्वरूपाची अतिक्रमणे केली होती. भाजीपाला विक्रेत्यांनी गाळे सोडून रस्त्यावरच दुकाने थाटून अरेरावीने वागत अतिक्रमण केले होते. त्यातच हातगाडीधारकांच्या अतिक्रमणामुळे अधिकच भर पडत गेली होती. या अतिक्रमणामुळे महिला ग्राहकांना अनेकदा छेडखानीच्या प्रकारांना सामोरे जावे लागले असून लहान-मोठे वादही उद्भवले आहेत.

त्यामुळे भाजीमार्केट मधील अतिक्रमणे हटविण्याबाबत वारंवार मागणी केली जात होती. भाजपा महिला मोर्चाने अतिक्रमण हटविण्यासाठी एल्गार पुकारला होता. पालिका प्रशासनाने अखेर भाजीमर्केटमधील सर्व अतिक्रमणे काढली. मुख्याधिकारी राहुल वाघ व सर्व अधिकारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सहभागी झाले होते. अतिक्रमण काढतांना गाळेधारकांना दुकानाबाहेर पुन्हा अतिक्रमण न करण्याची तंबीदेखील देण्यात आली आहे.

तसेच काही अतिक्रमणधारकांना तीन दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढण्याची मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमण काढताना पोलीस कुमक बोलावण्यात येऊन चोख बंदोबस्त

लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*