नंदुरबारमधील परिस्थिती नियंत्रणात, पण तणाव कायम

0

नंदुरबार, ( प्रतिनिधी ) ता. १० : नंदुरबार शहरातील परिस्थिती दुपारी नियंत्रणात येत असतानाच सायंकाळी कसाई मोहल्ला परिसरात पुन्हा दगडफेक झाली.

यावेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या तीन नळकांडया फोडल्या. शहरात तणाव असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

नंदुरबारमध्ये आज सकाळी दोन गटात झालेल्या भांडण आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी तत्काळ कडेकोट बंदोबस्त लागू केला होता.

त्यानंतर शहरात अघोषित संचारबंदीची स्थिती होती. मात्र अवघ्या दोन तासातच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

त्यामुळे दुपारनंतर येथील वातावरण निवळण्यास प्रारंभ झाला आणि सायंकाळी जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

दरम्यान सकाळी जमावाने केलेल्या दगडफेकीत आठ पोलिस जखमी, तर काही नागरिकांच्या घरांचे नुकसानही झाले होते.

त्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

LEAVE A REPLY

*