Type to search

Featured नंदुरबार फिचर्स

दारू विक्री करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Share

नंदुरबार  –

लॉकडाऊनच्या काळात दारु विक्रीवर बंदी असतांनाही मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 92 हजार 905 रुपयांच्या देशीविदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात दि. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

तरीही या आदेशाचे उल्लंघन करुन कमलेश रमण जायस्वाल (रा.वेडू गोविंद नगर, नंदुरबार), वर्षा प्रकाश चौधरी (रा.चौधरी गल्ली, नंदुरबार) यांच्याकडे देशीविदेशी मद्याचा साठा आढळून आला.

याबाबत पोना राकेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध भादंवि कलम 188 सह महा.दारुबंदी कलम 65, (ई), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 51 (बी) साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडून 92 हजार 905 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.जे.पाटील करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!