सुरक्षा रक्षकाच्या प्रशिक्षणासाठी 7 ला शिबिर

0
नंदुरबार । प्रतिनिधी-न्यूक्लीअस बजेट कौशल्य विकास अंतर्गत सन 2017-18 या वर्षात सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देणे या विकास योजनेस मंजूरी मिळालेली आहे.
या योजनेसाठी नंदुरबार, नवापूर, शहादा, तालूक्यातील इच्छूक अनुसूचित जमातीच्या यूवकांची निवड करण्यासाठी 7 जूलै 2017 रोजी सकाळी 9 वाजता एस. ए. मिशन हायस्कूल नंदूरबार येथे शिबीर आयोजित करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी, श्रीमती नीमा अरोरा, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या शिबीरामध्ये सहभागी होणार्‍या उमेदवारांनी पुढील कागदपत्राची एक छायांकीत प्रत व मुळ प्रत घेऊन नोदणी करावी व अर्ज सादर करावे.

या कागदपत्रामध्ये 2 फोटो, जातीचा दाखला, 10 वी 12 वी उत्तीर्ण गुणपत्रक, रहिवासी दाखला, आधारकार्ड यांचा समावेश आहे.

यासाठी किमान उंची 5 फुट 6 इंच , वजन 55 किलोग्रॅम, किमान 10 वी उत्तीर्ण असावे. अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालयातील 02564-210303 या दूरध्वनी संपर्क साधावा असेही प्रसिध्दी पत्रकानुसार कळविण्यात आले आहे.

तर या शिबीरासाठी मोठया संख्येने तरूणांनी सहभाग व्हावे असे आवाहन केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*