Type to search

maharashtra नंदुरबार

समता युवा मंचतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण

Share
नंदुरबार । येथील समता युवा मंच तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरीट नाका परिसर यांच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शाहिरा सिमा पाटील व जॉली मोरे यांचा भिम गीत गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक, राजकीय, साहित्य अशा विवीध स्तरातील मान्यवरांना राज्यस्तरीय समतारत्न व समताभुषण पुरस्काराने देवून सन्मानित केले.

नंदुरबार येथे समता युवा मंच तर्फे झालेल्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी सुलभा महिरे, बापू साळवे, ग्रामविकास अधिकारी आर.आर. वळवी, म्हाडाचे जिल्हाध्यक्ष सुनिल वळवी, पत्रकार जीवन पाटील, रणजीत राजपूत, नगरसेवक सदा रघुवंशी, राम साळुंके, प्रा.डॉ.बापू मंगळे आदी उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील जलसंधारणा व जलयुक्त शिवार, सामुहिक विवाह सोहळा व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल पी.के.पाटील प्रतिष्ठान नंदरबार, आंबेडकरी चळवळवी व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल फुले, आंबेडकर स्टडी सर्कल शहादा यांना पत्रकारीतेत उल्लेख्खनिय कार्याबद्दल भिकेश पाटील, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वरूप बोरसे यांना व कला सांस्कृतीक क्षेत्रातील शाहिरा सिमा पाटील व जॉली मोरे यांना समतारत्न पुरस्काराने खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रांल निंभे, योगेश लोंऐ, सौ.नेरकर, अनिकेत इंद्रजित यांचाही गौरव करण्यात आला. यशस्वीतेसाठी राम साळुंके, प्रा.डा.बापू मंगळे, सुभाष पानाटील, दिनेश तेजी, रहिम शेख, सुलतान मन्सुरी, भरत शिंदे, जितेंद्र पानपाटील, सचिन पिंपळे, सचिन पिंपळे, महेंद्र बाविस्कर, क्रिष्णा बोरसे, गणेश मोरे, गणेश शिरसाठ, श्याम साळुंके, प्रविण वाघ, संतोष शिरसाठ, अतुल रायसिंग, सचिन पाटील, रमेश राठोड, चेतन सोनजे, आनंद बागुल, राजेश मराठे, युवराज पाटील, गौतम पानपाटील, गणेश शिरसाठ, कैलास पानपाटील, मंगेश संदानशिव, नरेंद्र बाविस्कर, सिध्दार्थ साळुंके, सौरभ साळुंके, विवेक शिरसाठ, रूपेश बत्तीसे, संदिप कलाल, दिनेश तेजी, हर्षबोध बैसाणे, रोहिन शिरसाठ, सत्यजित वळवी, महेश सोनी, दिपक बंडीवार, किरण मराठे, अजय तिवारी, अशोक खांडेकर, अमोल पगारे आदींनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!