वेतन पडताळणीसाठी सादर सेवापुस्तके प्राप्त करावीत

0
नंदुरबार । प्रतिनिधी-जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांनी वेतन पडताळणी पथक नाशिक कार्यालयात माहे मे 2017 पर्यंत सादर केलेली सेवापुस्तके पडताळून निष्कर्ष नोंदविलेले आहेत.
मात्र काही कार्यालयांनी अद्यापही सदरची पुस्तके प्राप्त केलेल्या नसल्याने त्यांनी ज्या कार्यालयाकडून मे 2017 पर्यंत सेवापुस्तके वेतन पडताळणी पथक नाशिक या कार्यालयात जमा केली आहेत अशा कार्यालयांनी त्यांची सेवापुस्तक ही वेतनपडताळणी पथक नाशिक या कार्यालयाकडून प्राधिकार पत्रासह आपला प्रतिनिधी पाठवून प्राप्त करण्याची व्यवस्था करावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, गजानन पाटील यांनी केले आहे.

ज्या कार्यालयांनी त्यांचे आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक पडताळणी करून घेतलेली नाही अशा कार्यालयांनी त्वरीत सेवापुस्तकांची वेतन पडताळणी करून घ्यावी असेही कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

*