‘देशदूत’तर्फे आज नंदुरबारात ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ चित्रपटाची मेजवानी

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-येथील ‘देशदूत’तर्फे उद्या दि.20 रोजी सकाळी 9 वाजता अमर चित्रमंदिरात ‘सचिन’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटास शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
सामाजिक बांधिलकी ठेवून ‘देशदूत’तर्फे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा उपकम खास विद्यार्थ्यांसाठी ‘देशदूत’ने आयोजीत केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मास्टर ब्लास्टर महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.

यापुर्वीदेखील देशदूतने बालचित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. त्यालादेखील विद्यार्थ्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.

या चित्रपट शोचे उद्घाटन दि. 20 जून रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, रघुवंशी बुक डेपोचे संचालक तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, माजी नगरसेवक अशोक राजपूत, नगरसेविका सौ.भारती राजपूत, नंदुरबार विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष मोहितसिंग राजपूत यांची उपस्थिती लाभणार आहे.

हा चित्रपट महोत्सव येथील रघुवंशी बुक डेपो नंदुरबार व माजी नगरसेवक अशोक राजपूत यांनी प्रायोजित केला आहे. या चित्रपटाचा शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘देशदूत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*