Type to search

maharashtra नंदुरबार

व्यापार्‍याची एक लाखाची रोकड लंपास

Share
नंदुरबार । शहरातील अव्वलगाझी परिसरात 1 लाख 10 हजार रुपये रोख व मोबाईल चार अनोळखी इसमांनी जबरदस्तीने काढून घेतली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 मे रोजी नरेशभाई पुरुषोत्तमभाई वोढ (बिरसत जि.आनंद) यांच्या खिशातून चार अनोळखी इसमांनी 1 लाख 10 हजार रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत. दिवसाढवळया घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी या चोरटयांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!