Type to search

Featured नंदुरबार फिचर्स मुख्य बातम्या

पूजेच्या वेळी कोंबडा कापण्यास नकार दिल्याने पुजार्‍याचाच गेला बळी

Share

नंदुरबार – 

धडगाव तालुक्यातील चोंदवाडे (बु. बारीपाडा) येथे पूजा न करता घरी परत गेलेल्या पुजार्‍याचा राग आल्याने धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलिसांनी अटक केली आहे.

धडगाव तालुक्यातील चोंदवाडे बु. बारीपाडा येथील दिलीप सोन्या पावरा याने पुजारी मान्या माद्या राहासे (वय 54) यांना घरी पुजेसाठी बोलवले होते. परंतु दिलीप पावरा यांनी पुजेसाठी कोंबडा मारला नाही. यामुळे मान्या राहसेे पूजा न करताच स्वतःच्या घरी परत जात होता. त्याचा राग आल्याने दिलीप सोन्या पावरा, अशोक उर्फ वीरसिंग भाज्या पटले यांनी मान्या माद्या राहसे याच्या डोक्याच्या मागे उजव्या बाजूस धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारले.

पुरावा नष्ट करण्याच्य इराद्याने आवल्या दल्या पटले यांच्या शेतातून बारीपाडाकडे जाणार्‍या पायवाटेवर इलेक्ट्रिक डी.पी.जवळ मान्या राहसे याचा मृतदेह टाकून पळून गेले.

याबाबत ठुमला मान्या राहसे रा. चोंदवाडे बु. बारीपाडा, ता.धडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप सोन्या पावरा, अशोक उर्फ वीरसिंग भाज्या पटले (दोन्ही रा.चोंदवाडे बु.बारीपाडा,ता.धडगाव) यांच्याविरूध्द भादंवि कलम 302, 201, 34 प्रमाणे धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अशोक उर्फे वीरसिंग भाज्या पटले याला पोलिसांनी अटक केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!