प्रकाशा येथे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आनंद मेळावा

0
प्रकाशा, ता.शहादा । दि.27 । वार्ताहर-प्रकाशा येथे जेष्ठ नागरीक संघातर्फे आनंद मेळावा उत्साहात पार पडला. येथील श्री केदारेश्वर मंदिर सदगुरु दगडू बापूजी महाराज यात्रेकरु निवासात या आनंद मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते.
या कार्येक्रमाला गावातील व परिसरातील शहादा, तळोदा, नवापूर व शिरपूर तालुक्यातील असंख्ये जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक एस.टी. खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी मोहन भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले की, जेष्ठ नागरिक संघ हा एक मोठा परिवार आहे. वय झाले म्हणून सतत कुढत रडत बसू नका, कुटुंबात घराचा कामात हातभार लावा, तसेच जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष डॉ. सनत्कुमार वाणी यांनी उपस्थितांना आवाहन व मार्गदर्शन केले.

तळोदा येथील यू.जी.पिंपरे, शिरपूरचे भामरे, कवी भीमराव कढरे, दत्तू गुरुजी संघाचे प्रमुख पुनभाई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रमुख मान्यवर डॉ. सखारामभाई पाटील, मगनभाई मक्कन पटेल. नागपूरचे अ‍ॅड. गोविंदभाई विठ्ठल पाटील, प्राभाबुता पाटील आदी उपस्थित होते.

दिवंगत संभुभाई सदाशिव पाटील, रामदास चौधरी, राजाराम पाटील, विठ्ठल पाटील यांचा फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*