निवडणुकीचे दस्तावेज छपाईवर निवडणूक आयोगाचे निर्बंध

0
नंदुरबार । लोेकसभा निवडणुकीच्या कालावधीत पत्रके, भित्तीपत्रके किंवा अन्य दस्तावेज मुद्रकाने जिल्हादंडाधिकर्‍यांकडे पाठविल्याशिवाय छपाई करता येणार नाही किंवा छपाई करण्याची व्यवस्था करता येणार नाही. तसे झाल्यास सहा महिन्यांचा कारावास किंवा दोन हजाराचे द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षेस संबंधीत पात्र राहतील, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिला

श्री.मंजुळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये, कोणत्याही व्यक्तीला, ज्याच्या दर्शनी भागावर, त्याच्या मुद्रकाची व प्रकाशकांची नावे व पत्ते नाहीत असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक छपाई करता येणार नाही किंवा प्रकाशित करता येणार नाही, अथवा छपाई किंवा प्रकाशन करण्याची व्यवस्था करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला, कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक, तो त्याचा प्रकाशक आहे याची ओळख म्हणून, स्वत: स्वाक्षरीत केलेले आणि तिला व्यक्तीश:

ओळखणार्‍या अशा दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले घोषणापत्र तिने दोन प्रतींमध्ये मुद्रकाला दिल्याशिवाय आणि दस्तऐवजाची छपाई केल्यानंतर मुद्रकाने, वाजवी मुदतीत, त्या दस्तऐवजाच्या चार प्रतीसह घोषणापत्रची एक प्रत जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार यांच्याकडे पाठविल्याशिवाय, छपाई करता येणार नाही किंवा छपाई करण्याची व्यवस्था करता येणार नाही. जिल्हयातील सर्व प्रकाशक आणि मुद्रक यांनी याबाबत दक्षता घ्यावी.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 चे कलम 127-क च्या तरतूदींचे उल्लंघन करतील ती व्यक्ती, सहा सहा महिन्यांपर्यंत इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल एवढया द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

*