नंदुरबारात पोलिसाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्त्या

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हे.कॉ.मंगलसिंग पिराजी माळी (45) यांनी आज दुपारी आपल्या राहत्या घरात स्वतःच्या सर्व्हीस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील पोलीस मुख्यालयात हे.कॉ.मंगलसिंग पिराजी माळी (वय 45) हे कार्यरत आहेत.
त्यांनी आपल्या शहादा रस्त्यावरील अंजली गृहनिर्माण सोसायटीत आज दुपारी 4.20 च्या सुमारास स्वतःच्या सर्व्हीस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली.

गोळीच्या आवाराने परिसरातील नागरिकांनी माळी यांच्या घराकडे धाव घेतली असता ते रक्ताच्या थारोळयात मयतावस्थेत पडलेले आढळून आले.

त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत पोकॉ अशोक धनगर यांनी दिलेल्या खबरीनुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*