Type to search

नंदुरबार

जिल्ह्यातील पाच अधिकार्‍यांची पोलीस निरीक्षकपदी बढती

Share

नंदुरबार । जिल्ह्यात कार्यरत पाच सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. त्यात मुख्यालय, विसरवाडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्‍यांच्या समावेशआहे. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले.

त्यात वाचक शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी, विसरवाडीचे धनंजय पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक निरीक्षक संगीता पाटील, संतोष भंडारे, मुख्यालयातील योगेश कामाले, सुभाष जाधव यांचा समावेश आहे. या सर्व अधिकार्‍यांना कोकण व इतर विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तातडीने त्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!