Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनंदुरबार : सहा.पोलीस निरीक्षकावर हल्ला

नंदुरबार : सहा.पोलीस निरीक्षकावर हल्ला

13 जणांना अटक

नंदुरबार – 

लाकडाऊनमुळे बंद असलेल्या रस्त्यावरुन लहान शहाद्यात दोन गटात वाद झाला. या वादातून सहाय्यक पोलीस निरीक्षकास जमावाने मारहाण करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा गावात बामडोद रस्तावरील कोळी वस्तीकडे जाणारी वाट बंद केली होती. ती काही तरुणांनी वाट मोकळी केली. त्याबाबत तेथील लोकांनी वाट का मोकळी केली अशी विचारणा केल्याचा राग आला.या वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या यांना जमावाने मारहाण केली.

त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश निवृत्ती केदार व पोलीस पाटील मुकेश राजाराम पाटील हे जखमी झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश निवृत्ती केदार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार पोलीस ठाण्यात 90 ते 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीसांनी हाडु जाण्या भिल , गणेश मालसिंग भिल, परशु मोतीराम भिल , वसंत लक्ष्मण भिल, मनेश हाडु भिल ,अर्जुन घार्‍या भिल, अजय विजय भिल , सुकलाल उध्दव भिल, आत्माराम आनंद भिल, उतन्या उध्दव भिल,फुलसिंग जाण्या भिल, पिंटु विजय ठाकरे,अंबालाल ताराचंद भिल सर्व रा.लहान शहादा ता.जि. नंदुरबार या 13 जणांना अटक केली आहे.या ठिकाणी आर.सी.पी.प्लाटुन असा बंदोबस्त लावला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि जी.टी.पवार करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या