नवापूर येथे हॉटेल मालकाची पोलिसाला मारहाण

0
नंदुरबार । दि.20 । प्रतिनिधी-तालुक्यातील चिंचपाडा पोलीस दूरक्षेत्राचे हे.कॉ.नरेंद्र जगदाळे हे काल रात्री मोटरसायकलवरून गस्त घालत असतांना हॉटेल मनोहर येथे जेवणासाठी थांबले असता हॉटेल मालकाशी वाद झाला.
या वादानंतर हॉटेल मालकाने मात्र त्यांना जबर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री चिंचपाडा दूरक्षेत्रचे हे.कॉ.नरेंद्र जगदाळे हे गस्त घालत असतात नागपूर-सुरत महामार्गावरील हॉटेल मनोहरमध्ये चहा पिण्यासाठी आणि रात्रीचे जेवण बाकी असल्याने डबा घेण्यासाठी गेले होते.
जगदाळे यांनी चिकनची पिशवी घेऊन आपल्या मोटरसायकलाच्या हॅन्डलला लावली तेवढ्यात कुत्र्याने मोटरसायकलवरील चिकनची पिशवी पळवली.
जगदाळे हे पिशवीचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले. मात्र पैसे न देता ते निघून जात असल्याचे हॉटेल मालकाला वाटले. त्यामुळे त्यांनी त्यांना परत बोलवले.
जगदाळे हॉटेलमध्ये आल्यावर माझे चिकन कुत्रा घेऊन गेला त्याचा शोध घेत होतो, मला दुसरी भाजी द्या, त्यावर मालक म्हणाला मला आधी पैसे द्या, नंतर भाजी देतो.
यातून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ऑन ड्युटी पोलिस हेड कॉन्स्टेबल जगदाळे यांना पोलिसाच्याच दांड्याने मालकासह पाच जणांनी जबरदस्त मारहाण केली.

 

रात्रीच्या वेळी हॉटेलवर पोलिस ड्रेसवर येऊ नका, आमचे ग्राहक घाबरतात काही ग्राहक हॉटेलमध्ये येत नाहीत, धंद्यावर परिणाम होतो अशी बातचीत पोलिस व हॉटेल मालक यांच्या रात्रीच्या दरम्यान झाली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

हॉटेल मालकांने पोलिसांना शिवीगाळ व दमबाजी करून रात्री हॉटेलवर धिंगाणा घातल्याचा आरोप केला आहे.
मारहाणीदरम्यान कसेतरी जगदाळे यांनी स्वतःची सुटका करून चिंचपाडा पोलीस ठाण्यात गेले.

तेथून नवापूर मुख्य पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. नवापूर पोलिस ठाण्याची पोलीस गाडी महामार्गावरील चिंचपाडा जवळील हॉटेल एकता जवळ गस्त घालत होती. त्या पोलिस गाडीत नरेंद्र जगदाळे यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हॉटेल मनोहरचे मालक शारदाप्रसाद उर्फ पप्पूशेठ मनोहर जयस्वाल, मुलगा गोल्टी उर्फ आदर्श शारदाप्रसाद जयस्वाल, पुतण्या निर्भय उर्फ लकी देवी प्रसाद जयस्वाल यांच्यावर नवापूर पोलिस ठाण्यात नवापूर पोलीस स्टेशनला भा.द.वि. कलम 307, 353, 333, 427, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*