Type to search

maharashtra नंदुरबार

नंदुरबार येथे लाचखोर पोलिसाला अटक

Share
नंदुरबार । नंदुरबार येथे गुन्हयाच्या कामात मदत करण्यासाठी व अटक न करण्यासाठी चार हजाराची लाच स्विकारतांना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळ तक्रारदार हे पापनेर नारायणपूर ता.जि.नंदुरबार येथील राहणारे असून त्यांच्याविरूध्द त्यांचे शेजाच्याशी भांडण झाले होते. त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूध्द तक्रार दिली होती. सदर गुन्हयात अटक न करण्यासाठी व गुन्हयाच्या कामात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार बबन बापू पाटील याने तक्रारदाराकडून 6 हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 4 हजार रूपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार येथे लेखी तक्रार दिल्याने पोलीस हवालदार बबन पाटील यांनी पडताळणी दरम्यान 4 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारतांना-पंचासमक्ष नंदुरबार शहरातील काकाका ढाबा समोर हरहर महादेव रसवंतीजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक,अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शिरीष टी.जाधव,पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता एस.पाटील,पोलीस निरीक्षक करुणाशिल तायडे, पोहेकॉ उत्तम महाजन,संजय गुमाणे,पोलीस नाईक, दिपक चित्ते,संदीप नावाडेकर,अमोल मराठे, मनोज अहिरे,मपोना ज्योती पाटील,चापोना मनोहर बोरसे यांच्या पथकाने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!