पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार

0
नंदुरबार। नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहे. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून आज नंदुरबारमध्ये युतीचे नेते, पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. मात्र युतीच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीत बहिष्काराचे हत्यार उपसत काढता पाय घेतला. बैठकीतून नेते निघून गेल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.

नंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहे. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून आज शहरातील सिंधी कॉलनीत भाजपा सेना युतीची बैठक बोलविण्यात आली होती.बैठक सुरू असतांना नंदुरबार लोकसभा मतदार संघात युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीत बहिष्काराचे हत्यार उपसत काढता पाय घेतला. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, युवती सेनेच्या मालती वळवी, मुबंईच्या शालिनी देशपांडे, तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार खासदार हिना गावीत यांचेच फोटो होते. सेनेच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

युतीचा धर्म पाळण्यासाठी दक्षता घेणार
देशात शिवसेनेचे महायुती झालेली आहे.तसा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांकडून घेण्यात आलेला आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्वच कार्यकर्ते कामाला लागले आहेत समज-गैरसमज करण्याचे काही कारण नसून, युतीचा धर्म पाळण्यासाठी अधिका-अधिक दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत दिली

LEAVE A REPLY

*