Type to search

maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या

पंतप्रधान रविवारी नंदुरबारात

Share
नंदुरबार । राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान 2.0 (ठणडअ) या योजनेतंर्गत मंजुर नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज नंदुरबारचे (डिजिटल लॉन्चींग) कोनशिला अनावरण समारंभ रविवार दिनांक 3 फेब्रूवारी, 2019 रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिरसामुंडा सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार या ठिकाणी होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन राज्याचे मंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण व क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन तथा पालकमंत्री जयकुमार रावल, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, खा.डॉ. हिना गावीत, आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. अमरिशभाई पटेल, आ. सुधीर तांबे, आ. किशोर दराडे, आ. सुरुपसिंग नाईक, आ.डॉ. विजयकुमार गावीत, आ.ङ के.सी. पाडवी, आ. उदेसिंग पाडवी, उच्च व तंत्र शिक्षण सचिव सौरभ विजय, रुसा राज्य प्रकल्प संचालक श्रीमती मीना लोचन, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,

सा.बा. प्रादेशिक वि. औरंगाबादचे उपमुख्य वास्तूशास्त्रज्ञ संजय गेडाम उपस्थित राहणार असल्याचे संचालक उच्च शिक्षण डॉ. धनराज माने, सहसंचालक उच्च शिक्षण जळगांव डॉ. प्रशांत मगर, सा.बा. विभाग, नंदुरबारचे कार्यकारी अभियंता अनिल पवार यांनी कळविले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!