नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प मेळावा

0
नंदुरबार। नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या अधिकृत उमेदवार खा.डॉ.हीना गावित यांच्या प्रचारार्थ दि.22 रोजी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदानावर दि.22 सोमवार रोजी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार खा.डॉ.हीना गावित यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वमूभीवर काल हॉटेल हिरा एक्झिकेटीव्ह येथे आयोजित पत्रकार परिेषदेप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल, खा.डॉ.हीना गावित, प्रा.डॉ.रविंद्र चौधरी, संघटन मंत्री किशोर काळकर तसेच बबनराव चौधरी उपस्थित होते. यावेळी सभेबाबत माहिती देतांना ना.रावल म्हणाले की,

नंदुरबार जिल्ह्यावर पंतप्रधान मोदी यांचे विशेष प्रेम आहे. गेल्या पाच वर्षात नंदुरबारचा विकास होण्यासाठी आकांक्षीत जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात आला. यामुळे उज्वला योजनेंतर्गत 1 लाख 52 हजार गॅस जोडणी, सुमारे 1 लाख 26 हजार घरांना सौभाग्य योजनेंतर्गत लाभ, 1 लाख 10 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर, 2 लाख 35 हजार लाभार्थ्यांना शौचालय, मॉडेल कॉलेज, तोरणमाळ येथे अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूल या सारखी अनेक विकासात्मक कामे झाली आहेत.

यामुळे पुन्हा एकदा नंदुरबार लोकसभा मतदार संघातून भाजपाला संधी मिळावी यासाठी दि.22 रोजी सकाळी 11.30 वाजता श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील स्व.अटल बिहारी वाजपेयी मैदानावर नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी विजय संकल्प मेळावा होणार असल्याचे रावल म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे रामदास आठवले, ना.डॉ.सुभाष भामरे, ना.गिरीष महाजन, आ.दादा भूसे उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*