पेन्शनराच्या संरक्षणासाठी समस्या सोडविण्याचा प्रयत्न

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-पेन्शनराचे संरक्षण, संवर्धन, संघटन व संचलन करुन आपल्या सर्वस्तरीय व्यथा व कथा ऐकून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष सोमनाथ नाईक यांनी केले.
शहरातील तैलिक मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनतर्फे वार्षिक सभा व मेळावा घेण्यात आला. त्यात नाईक बोलत होते.
या मेळाव्यास कार्याध्यक्ष सुभाष कुर्लेकर, कोषाध्यक्ष वासुदेव साठे, सरचिटणीस लक्ष्मण टेम्बे, विभागीय अध्यक्ष रा.जा.पवार, धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाचे कार्याध्यक्ष दयाराम पवार, जिल्हाध्यक्ष सिताराम शेवाळे, उपाध्यक्ष काशिनाथ राठोड, सचिव मधुकर साबळे, माजी अध्यक्ष चिंतामण पवार, शांतीलाल शिंदे, सहसचिव दिलीप पाटील, रामभाऊ कोळी, नारायण राजकुळे, नकुल वळवी बन्सी पवार, शिवदास चित्ते, हिरकन भोई, भिमसिंग मोरे, रमेश माळी आदी उपस्िित होते.
सुरूवातीस सभासदांसह व इतर क्षेत्रातील दिंवगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. संघटनेचे उत्कृष्ट कार्य करणार्‍या सभासदांसह निवत्ती सेवा पुरस्कार मिळविलेले सभासद नारायण राजकुळे, तानाजी पराडके, नकुल वळवी, गोविंद पाटील, भास्कर पाटील, भिमसिंग मोरे, शिवदास चित्ते, सिंधू सावंत, प्रतिभा कुळकर्णी, मधुकर साबळे, रामभाऊ कोळी व वयाचे 80 वर्ष पूर्ण करणार्‍या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन 2016-17 चे वार्षिक लेखा परिक्षण व तेरीज पत्रक-ताळेबंदावर चर्चा करुन मंजुरी घेण्यात आली.

सन-2017-18 च्या अंदाजपत्रकांस मंजूरी देण्यात आली. या सभेत करण्यात आलेले ठराव असे, निवृत्त राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दरमहा 1 तारखेस पेन्शन मिळते, त्याप्रमाणे जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या निवृत्तांनाही 1 तारखेस मिळावी तसेच अन्य आर्थिक लाभही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणेच वेळेवर मिळावेत.

केंद्र शासनाचे सेवानिवृत्तांना 7 वा वेतन आयोग दि.1-1-2016 पासून लागू केलेला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही त्वरीत निर्णय घेऊन सर्व लाभ तंतोतंत लागू करावेत.

केंद्र शासनाच्या सेवानिवृत्तांना वैद्यकिय भक्ता दरमहा रुपये 500 दिला जातो, तो महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्तांना देण्यात यावा. सेवानिवृत्तांना केंद्राप्रमाणे दि.1-1-2006 पासून सहावा वेतन आयोग लागू करावा.

केंद्राप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातील लाभ तंतोतंत लागू करावेत. किमान मूळ निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन केंद्राप्रमाणे 9000 रुपये मिळावे.

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन सेवानिवृत्तांना 1-1-2006 पासून 80 वर्षावरील सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन वाढ अनुक्रमे 80 वर्ष 20 टक्के, 85 वर्ष 30 टक्के, 90 वर्ष 40 टक्के, 95 वर्ष 50 टक्के व 100 वर्षावरील सेवानिवृत्तांना 100 टक्के निवृत्तीवेतन वाढ दिली जाते.

महाराष्ट्र शासनाने दि.1-4-2014 पासून सरसकट 100 टक्के वाढ दिलेली शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, इत्यादीसाठी जास्त खर्च करावा लागता तो केंद्राप्रमाणे मिळावा.

निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या निवडश्रेणीच्या संदर्भात जिल्हा परीषद प्रशासन पोटतिडकीने प्रस्ताव मार्गी लावत नाहीत म्हणून शासनाने संबंधित प्रशासनांस स्वतंत्रपणे खास आदेश काढावा.

दि.1-1-1968 ते 26-2-2009 या कालावधीत लागलेल्या प्राथमिक शाळा-माध्यमिक शाळा व आश्रमशाळेतील शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मिळणेसाठी अकारण उच्च शिक्षणांची घातलेली अट शासनाने रद्य करावी.

त्यामुळे 95 टक्के शिक्षक निवडश्रेणी पासून वंचित आहेत. महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्तांसाठी केंद्राप्रमाणे मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण करावा.

दि.1-1-2006 ते 26-2-2009 या कालावधीत सेवानिवृत्तांना केंद्राप्रमाणे लाभ मिळावेत म्हणून मा.उच्च न्यायालयाचे खंडपिठ औरंगाबाद/नागपूर यांनी आदेश देवूनही मा.सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे शासनाने या निर्णयाविरुध्द अपील दाखल करुन स्थगिती घेतलेली आहे.

त्यामुळे संघटनेने सर्वोच्च न्यायालयात इंटरव्हेशन दाखल केलेले आहे.त्यावर शासनाने विचार करावा.(एसएलपी नं.6189/2015). दि.1-7-1972 नंतरच्या अप्रशिक्षीत निवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळणेबाबत-शासनाने निर्णय न घेतल्याने नाईलाजाने मा.उच्च न्यायालयात दाद मागावी लागली.

नगरपालिका निवृत्तांना हायकोर्टाचे व शासनाचे आदेश असूनही दरमहाचे पेन्शन-महागाई आदिचा फरक व निवृत्तीनंतरचे रजारोखीकरण, अंशराशीकरण, उपदान, 5 व्या व 6 व्या वेतन आयोगाचे फरक वेळेवर मिळत नाहीत. उपदानाची रक्कम केंद्राप्रमाणे रु-10 लाख करावी अदि ठराव सर्वानुमते करण्यात आले.

यावेळी सिताराम शेवाळे यांनी वर्षभरांतील विविध उपक्रम व पेन्शनरांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली.

नाईक यांनी सांगितले की, संघटन व संघशक्तीने समस्या सुटत असतात प्रश्न मार्गी लागून आर्थिक लाभ पदरात पडत असतात म्हणून संघटन बळकट करा. संघटनेचे सभासद व्हा. आपली तरतूद सोडून बाकीची कोषाध्यक्ष आत्माराम इंदवे यांनी तर आभार आर.ए. कोळी यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*