नंदूरबार पंढरपूर एसटी बसचा मनमाडजवळ अपघात

0

मनमाड ( प्रतिनिधी ):-नंदुरबारहुन -पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसचा मनमाड जवळ अपघात होऊन 20 ते  22 प्रवासी जखमी झाले आहेत.

त्या पैकी 5 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले असून उर्वरित जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी आणि ट्रक ची सामोरा समोर धडक झाल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच विविध राजकीय पक्षांचे नगर सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अपघातास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मदत केली.

LEAVE A REPLY

*