कृउबासच्या सभापतीपदी भरत पाटील, उपसभापती लिलाबाई गिरासे

0
नंदुरबार । प्रतिनिधी-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 2016- 21 या कालावधीकरीता नियुक्त संचालक मंडळातील सभापती सयाजीराव मोरे व उपसभापती राजाराम पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे नविन सभापती भरत पाटील, उपसभापतीपदी सौ.लिलाबाई गिरासे यांची निवड करण्यात आली.

सभापती निवडणूकीचे कामकाज प्राधिकृत अधिकारी एन.बी.चौधरी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी पाहिले तसेच सहाय्यक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी कामकाज केले.

त्याप्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नविन सभपती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, दत्तु चौरे व विद्यमान संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*