Type to search

नंदुरबार

 नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना बहुमताने मंजुरी

Share

नंदुरबार । नंदुरबार नगर परिषदेकडे हस्तांतरणीय विकास हक्क (टि.डी.आर.) देवून जमिन अधिग्रहण करणेसाठी प्रणाली व कार्यपध्दती निश्चित करणे समितीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना समाविष्ट न केल्याने हि समिती बेकायदेशीर असल्याचा आरोप करत प्रधानमंत्री आवास योजनेत दिरंगाई होत असल्याचे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी केली. सभेत 17 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

नंदुरबार येथील पालीकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्ष सौ.रत्नाताई रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपनगराध्यक्ष परवेज खान, मुख्याधिकारी गणेश गिरी,कार्यालयीन अधिक्षक संजय माळी उपस्थीत होते.नंदुरबार नगर परिषदेचा सन 2018-19 या आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्चाचा बारमाही हिशोब मंजुर करणे ,नंदुरबार नगर परिषदेकडे हस्तांतरणीय विकास हक्क देवून जमिन अधिग्रहण करणेसाठी (टि.डी.आर.) प्रणाली व कार्यपध्दती निश्चित करणे बाबत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन 2022 या वर्षा पर्यतच्या पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करुन देणे कामाच्या योजनेची अमंलबजावणी करणे,

अमृत योजने अंतर्गत सन 2015-16 या वर्षासाठी नमस्कार कॉलनी ,ब्युरीयल ग्राऊंड,ओपन स्पेस क्र.9 व 11 च्या जागेत पब्लीक पार्क विकसीत करणे कामाचे मक्तेदार मे. प्रपोर्शन्स, जळगांव यांचा सदर कामास मुदतवाढ मिळणे कामी आलेल्या अर्जावर निर्णय घेणे बाबत,अमृत योजने अंतर्गत सन 2016-17 या वर्षासाठी खुली जागा क्र.1,2,3,4,5,6,7,8 व 10 च्या जागेत पब्लीक पार्क विकसीत करणे कामाचे मक्तेदार मे. प्रपोर्शन्स,जळगांव यांचा सदर कामास मुदतवाढ मिळणे कामी आलेल्या अर्जावर निर्णय घेणे, अमृत योजने अंतर्गत अमृत वन विकसीत करणे कामाचे मक्तेदार मे. प्रपोर्शन्स,जळगांव यांचा सदर कामास मुदतवाढ मिळण, नंदुरबार येथील स.नं 175/2 पैकी नगर परिषदेस आवश्यक नसलेली जागा फायर ब्रिगेड स्टेशन या आरक्षणातून वगळून रहीवास विभागात समविष्ठ करणे ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सी व डी करीता शुल्क आकारणी करणे कामी विचार विनिमय करणे,संगणक प्रणाली अद्ययावत करणे करीता आवश्यक खरेदी करण्यासाठी संभाव्य खर्चास मंजुरी देणे,नंदुरबार न.पा. हद्यीतील स. नं. 400 ते 404 चे क्षेत्र शेती विभागातुन वगळून रहिवास विभागात समाविष्ठ करणे कामी घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजुरी देणे बाबत.आदी 17 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

यावेळी विषय क्रमांक 4 ला विरोधी पक्षनेता चारूदत्त कळवणकर यांनी आक्षेप घेतला. नंदुरबार नगर परिषदेकडे हस्तांतरणीय विकास हक्क (टि.डी.आर.) देवून जमिन अधिग्रहण करणेसाठी प्रणाली व कार्यपध्दती निश्चित करणे समितीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना समाविष्ट न केल्याने हि समिती बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला तर नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी विषय क्रमांक 5 बाबत सांगीतले की,प्रधानमंत्री आवास योजनेत दिरंगाई होत असल्याचे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यासह पालिकेत न्यायालयाचे आलेल्या टपाल दाबुन ठेवल्याचा प्रकार घडला असुन याची चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केला.यासह मागिल सभेत चर्चा झालेल्या गौर्‍या डेपोबाबत कुठलीही प्रगती झाली नसल्याबाबत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!