Type to search

maharashtra नंदुरबार

नंदुरबार पालिका स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेसाठी सज्ज

Share
नंदुरबार । स्वच्छ भारत अभियान ही केंद्र शासनाची 2014 पासून सुरु असलेली योजना आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण ही मोहिम हाती घेतलेली आहे. त्या अंतर्गत सुरु असलेल्या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नंदुरबार पालिका सज्ज झालेले आहे.

नंदुरबार नगर परिषदेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये ओडीएफ + व जीएफसी थ्री स्टार रेटींग मानांकन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह येथे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षण-2019 मध्ये ओडीएफ + व जीएफसी थ्री स्टार रेटींग मानांकन विषयावर पालिकेच्या अधिकारी,कर्मचारी व शहरातील स्वच्छतादूत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.

त्यात मोहिमेच्या पुढील टप्प्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.पालीकेत झालेल्या पालिकेला स्पर्धेमध्ये वरचे स्थान मिळविणे करिता स्वच्छते बाबत शहरातील नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरात घंटागाडी फिरुन घरोघरी जावून ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन देणे हे किती गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शहर स्वच्छ ठेवणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे.

असे शहरातील जनतेला आवाहन करण्यात आले.बैठकीत मुख्याधिकारी गणेश गिरी, कार्यालय अधिक्षक संजय माळी, नोडल ऑफिसर विशाल कामडी, दिपक मुळे, यशवंत निकुंबे, नगर अभियंता श्यामकुमार करंजे, गणेश गावीत तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.नंदुरबार शहरात उघड्यावर शौचास जाणे पूर्णपणे बंद झालेले आहे. शहर हगणदारीमुक्त करणेकरीता गुड-मॉर्निंग पथक नेमण्यात आले.

तसेच नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधणेसाठी प्रत्येकी 17 हजार रूपये वितरीत करण्यात येवून शौचालय बांधून घेण्यात आले. तसेच नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाचा पुरेपूर वापर करण्यासाठी नागरीकांच्या मागणीनुसार सर्व सार्वजनिक शौचालयांचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे. तसेच दि. 24 मार्च 2016 अन्वये नंदुरबार शहर हे हगणदारीमुक्त शहर घोषित करण्यात आलेले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!