Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

नंदुरबारात पाकिस्तानी झेंड्याची होळी

Share

नंदुरबार । काश्मीरमधील पुलवामा येथे काल झालेल्या आत्मघाती हल्ल्यात भारतीय 44 जवान शहिद झाले. या घटनेचा सर्व निषेध करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयातही या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानी ध्वजाची होळी करण्यात आली. तसेच अल्पसंख्यांक विकास हक्क फाऊंडेशनतर्फे जैश-ए-महम्मद आतंकवादी संघटनेचा म्होरक्याच्या पुतळयाचे दहन करण्यात येवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली.

जम्मु काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी काल भारतीय जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यामुळे एका बसमध्य असलेले भारतीय 44 जवान शहिद झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेचा बदला त्वरीत घेवून प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील अंधारे चौकात देशप्रेमी लोकांकडून पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

काश्मीर येथील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी येथील संतप्त युवकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला आणि हुतात्मा झालेल्या 44 जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

पुलवामा तील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद नंदुरबारमध्ये देखील तीव्रपणे उमटत असून दहशतवादी कारवायांबाबत अत्यंत संतप्त भावना लोकांमधून उमटत आहेत. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज दुपारी शहरातील अंधारे चौक येथे सर्व देशप्रेमी नागरीकांसह युवक मोठ्या संख्येने एकत्र झाले. शहीद झालेल्या जवानांप्रती सद्गतीत भावना व्यक्त केल्या. पाकिस्तानला आता धडा शिकवाच, दहशतवाद्यांचा बिमोड करा अशी मागणी सगळ्या युवकांनी केली. तसेच पाकिस्तानचा निषेध नोंदवणार्‍या घोषणा देत आणि हिंदुस्थानचे जवान अमर रहे म्हणत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध नोंदवला. या वेळेस जितेंद्र राजपूत, पंकज राजपूत, आकाश गावित, अंबालाल राजपूत, विशाल चौधरी, योगेश राजपूत, घारू कोळी, रवी चौधरी, जीवन भाई, सुरेश धनगर, दिनेश मराठे, शेखर वसईकर तसेच टॅक्सी चालक-मालक रिक्षा युनियन कॉलेजचे विद्यार्थी राष्ट्रप्रेमी नागरीक मोठ्याा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे तीव्र निषेध करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी करण्यात आली. तसेच देश आणि देशातील जनतेचे आणि सैनिकांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी सरकारने दहशतवादी पोसणार्‍या पाकिस्तानवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जत्र्या पावरा, विजय सोनवणे, अजय कासार, संग्राम राजपूत, विवेक चौधरी, धनंजय बारगळ, बच्चुकाका सोनार, प्रा.राजाराम राणे, जगदीश जायस्वाल, सचिन भदाणे, इंद्रसिंग गिरासे, राजा साळाी, दिलीप बोरसे, मयुर कासार, केशव पाठक, सौ.उषा राजपूत, लिना पाटील, संजय जावरे, रमाकांत मगरे यांची नावे आहेत.

दरम्यान, आज शुक्रवार असल्याने मुस्लीम समाजबांधव मशिदीवर एकत्र आले होते. त्यांनी रस्त्यावर येवून घटनेचा निषेध करण्यात आला. अल्पसंख्यांक विकास हक्क फाऊंडेशनतर्फे वाघेश्वरी चौफुलीवर जैश-ए-महम्मदचा म्होरक्या हाफीज सईद याच्या पुतळयाची होळी करण्यात आली. यावेळी आरिफ शहा, मतीन शेख, अल्ताफ मिर्जा आदी उपस्थित होते. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देवून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

शहादा
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे भारत मातेच्या रक्षणार्थ झटणार्‍या 44 सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केल्याने त्यांना वीरगती प्राप्त झाली. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सायंकाळी शहादा शहरातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा पत्रकार व सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मूक मोर्चात सहभाग घेतला. गुरुवारी दुपारी पुलवामा याठिकाणी सैनिकांच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. या घटनेत 42 जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. हृदयाला पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे हा आत्मघाती हल्ला वीरजवानांवर नसून सर्व भारतीयांवर आहे.

आपल्या देशावर सातत्याने हल्ल्याची ही काही पहिली वेळ नाही याचे उत्तर देण्याची ताकद भारतीय वीर सैन्यात आहे. शहीद झालेल्या 44 वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी शहादा नगरपालिका यांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चाची सुरुवात हुतात्मा लालदास चौक येथून करण्यात आली. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते शहीद स्मारकाजवळ मेणबत्त्या पेटवल्या होत्या. जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष दीपक पाटील जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. कांतिलाल टाटिया, नगरसेवक प्रा.मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष रेखा चौधरी, उत्तर महाराष्ट्र मराठा समाजाचे अध्यक्ष श्याम जाधव, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख जहीर शेख बशीर, विनोद सोनार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जितू जमदाडे जयेश देसाई, अजय शर्मा, दिनेश खंडेलवाल, यशवंत चौधरी, नगरसेवक संदीप पाटील, नगरसेविका शमीन हकीम, गिरधर पाटील, मुन्ना टेलर, हकीम कुरेशी ज्ञानेश्वर चौधरी, किशोर पाटील, माजी नगरसेवक के.डी.पाटील, प्रा. रवींद्र पंड्या, पुरुषोत्तम चौधरी, प्रा.लियाकत सय्यद, शहादा तालुका एज्युकेशनचे व्हा.चेअरमन हिरालाल पाटील, नगरसेवक संजय साठे, डॉ.कदम, नगरसेवक आनंदा पाटील, आतीत पटेल, वाजीत सय्यद, पुरुषोत्तम चौधरी, इंग्लिश स्कूलच्या चेअरमन प्रीती अभिजीत पाटील, मोतीलाल जैन, राजेश जैन, गणेश पाटील, जयदेव पाटील, नगरसेवक संजय चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.किशोर मोरे, सचिन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, संतोष वाल्हे, रोहन माळी, मुर्तुजा इजी, डॉ.योगेश चौधरी, डॉ.अमोल वैद्य, डॉ.किशोर मोरे, नरेंद्र पाटील प्रा. अनिल साळुंखे यांच्यासह शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हुतात्मा चौक येथून मुकामोर्चास सुरुवात करण्यात आली होती. बाजार चौक, चार रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार घालून जनता चौकात वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली

तळोद्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली व पुतळ्याचे दहन
तळोदा येथील स्मारक चौकात जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील घटनेत शहिद झालेल्या जवानांना सर्वपक्षीय नेते व नागरिकांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निषेध मोर्चा काढून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आ.उदेसिंग पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, नगरसेवक जितेंद्र माळी, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, संजय वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, अ‍ॅड संजय पुराणिक, जगदीश परदेशी, जयेश सूर्यवंशी, विपुल कुलकर्णी, योगेश पाडवी, श्रावण तिजवीज, जालंधर भोई, राजपूत, गोकुळ गुरव, संजय पटेल यांसह तळोदा शहरातील विविध पक्ष, संस्था व संघटनांचे नेते व पदाधिकार्‍यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज तळोदा बंद
जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्याच्या निषेधार्थ उद्या दि.16 रोजी तळोदा बंद चे आवाहन शहारातील सर्व पक्ष व नागरिकांतर्फे करण्यात आले आहे. याबाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काश्मीर येथे दि. 14 फेब्रुबारी 2019 रोजी रोजी पाकिस्तानच्या मदतीवर पोसलेल्या षंढ अतिरेक्यांनी या शूर-वीर जवानांवर भ्याड हल्ला करुन 44 जवानांचे बळी घेतले. भ्याड हल्ला केवळ भारतभूमी वरील हल्ला नसून मानवतेवरील हल्ला आहे. पाकिस्तान हा देश संपूर्ण मानवजातीला हळू-हळू विनाशाकडे घेऊन जात असून संपूर्ण सृष्टी त्योन धोक्यात आणलेली आहे. वारंवार त्याचा भयानक क्रुर आतंकवादी चेहरा जगासमोर उघड झाला आहे. संपूर्ण देशभर या घटनेने जनभावना प्रक्षुब्ध असून पापी पाकिस्तानबद्दल जनमानस संतप्त आहे. आता संयमाचा बांध फुटलेला आहे. पाकिस्तान हा कधीही शांततेच्या मार्गाने ऐकणारा देश नाही हे वारंवार सिध्द झाले असल्यामुळे भारताने या मानवतेच्या शत्रूसोबत निर्णायक शेवटचे युध्द पुकारून जगाच्या नकाशावरुन त्याचे अस्तित्व मिटवावे व संपूर्ण जगाला या आतंकवादाच्या राक्षसापासून मुक्त करावे. यासाठी वीर जवानांच्या बलिदानाला नमन करुन या भ्याड हल्याच्या निषेधार्त तळोदा शहरातील सर्व पक्षीय व शहरातील सर्व देशभक्त नागरिकांतर्फे उद्या दि.16 फेब्रुवारी 2019 रोजी तळोदा शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष जितेंद्र दुबे, नगरसेवक गौरव वाणी, जितेंद्र सुर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, रामानंद ठाकरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, मनसे तालुकाध्यक्ष कल्पेश सुर्यवंशी, जगदीश परदेशी, दिपक चौधरी, शिरीष माळी, आनंद सोनार, दिपक ठाकरे, बापु कलाल, जगदीश चौधरी, विपुल कुलकर्णी, योगेश मराठे, किरण ठाकरे, कार्तिक शिंदे, शिवम सोनार, इमरान शेख, नितेश माळी, भुषण सुर्यवंशी, विजय मराठे, विवेक चौधरी, आदींसह शहरातील नागरिक उपस्थीत होते.

यावेळी माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले, जवानांवर हा भ्याड हल्ला म्हणजे प्रकारच्या भारत देशावरच आघात आहे. यावेळी भारत सरकारने पाकिस्तान विरोधी सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून ते अतिरेकी आहेत त्यांना शोधून शोधून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जो हा जवानांवर हल्ला झाला आहे त्याच्या मी जाहीर निषेध करतो.

आ.उदेसिंग पाडवी म्हणाले, पुरीनंतर हा सर्वात मोठा हल्ला भारतीय जवानांवर झाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान व जनतेने याच्या तीव्र संताप व्यक्त केला आहे. निश्चितपणे याचा त्याचा बदला भारत सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठीच आत्ताच पंतप्रधान यांच्या बंगल्यावर याबाबतीत काय निर्णय घ्यावा व तात्काळ घ्यावा व पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करावे याबाबतीत बैठक घेण्यात येत आहे. या घटनेच्या मी लोकप्रतिनिधी म्हणून तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो.

एकलव्य आदिवासी संघटना
तळोदा येथील एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तहसीलदारांनानिवेदन देण्यात आले आहे. त्यात काश्मीरमधील घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणपत पाडवी, उपाध्यक्ष योगेश पाडवी, उमेश वसावे, पिंट्या पाडवी, तळोदा शहराध्यक्ष विनोद पाडवी, विष्णू गावीत, राजू साळवे, जगन ठाकरे, सुनील पाडवी, रमेश वसावे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!