Type to search

नंदुरबार

दसर्‍याचे सोने लुटत नागरिकांनी केले सीमोल्लंघन

Share

नंदुरबार ।  जिल्ह्यात दसर्‍यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात नंदुरबार येथे विजयादशमी निमित्त आर.एस.एसतर्फे पथसंचलनासह शिवप्रतिष्ठानतर्फे हिंदुस्थानतर्फे दुर्गा दौड काढण्यात आली नंदुरबार येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात विजयादशमी निमित्त शस्त्र पुजन करण्यात आले. नंदुरबार शहरातून राष्ट्रीय स्वंयसेवक संघातर्फे दसर्‍यानिमित्त पथसंचलन करण्यात आले.

विजयादशमी अर्थात दसर्‍या निमित्त जिल्ह्या

त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नंदुरबार शहर शाखेतर्फे विजयादशमी व शस्त्र पूजन उत्सव म्हणण्यात मणवण्यात आला. सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास माळीवाडा परिसरातून पथसंचलन सुरुवात झाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन करण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात विहिपचे महामंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केले. तर नंदुरबार येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे नवरात्रोत्सव हा दरम्यान दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते.दसर्‍यानिमित्त दुर्गादौडच्या समारोपप्रसंगी शहरातील प्रमुख मार्गावरून दुर्गा दौड काढण्यात आली.यावेळी जागोजागी औक्षण करून दुर्गाचे स्वागत करण्यात आले.

नंदुरबार येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन करण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलिस दलाचे अशिकारी व कर्मचार उपस्थित होते. नंदुरबार शहरातील विविध भागात मंगळवारी सायंकाळी उत्सवी वातावरण होते. नागरिक एकमेकांना सोने देत शुभेच्छा देत होते.नंदुरबार शहरासह गुजरात राज्याच्या विविध भागातून भाविक याठिकाणी दुगार्माता मूर्ती विसर्जनासाठी व त्यांनी होडीतून जाऊन देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले. सकाळपासूनच परिसरातील भाविक ग्रामस्थ व घट विसर्जनसाठी येथे गर्दी करीत होते. सवाद्य मिरवणुकांद्वारे याठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी दाखल झतल्याचे चित्र सकाळपासून होते. विसर्जनापूर्वी महिलांकडून गरबा नृत्य करुन देवीला निरोप देण्यात आला. ज्या भक्तांनी घरी घटची स्थापना केली होती. त्यांनी देखील डोक्यावर घट नदीत विसर्जित केले. यातून केदारेश्वर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती.

एस.टी.डेपोत आपट्याच्या झाडाचा वाढदिवस साजरा
नवापूर येथील 10 वर्षांपूर्वी नवापूर एसटी डेपो मध्ये आपट्याचे (सोन्याचे)वृक्षरोपण करण्यात आले होते.या वुक्षारोपनासह शस्त्र पुजन करण्यात आले.

एसटी वाहक,चालक,स्वच्छक,यंत्र दुरुस्ती तंत्रज्ञ आणि अधिकार्‍यांना दसरा सण कर्तव्यावर असतांना डेपोतच साजरा करत यावा म्हणून निसर्ग पर्यावरण मित्र इंजि.बबनराव जगदाळे ह्यांनी 10 वर्षांपूर्वी नवापूर एसटी डेपो मध्ये आपट्याचे (सोन्याचे)वृक्षरोप लावले होते.एसटी डेपो मॅनेजर इंजि. राजेंद्र अहिरे ह्यांनी डेपोत सर्व अधिकारी ,कर्मचारी, वाहक,चालक यांना एकत्र आणत आपट्याचा झाडाला पुष्पहार करून करून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी इंजि.प्रज्ञा अहिरे आणि संगिता जगदाळे ह्यांनी दुरुस्ती कामात उपयोगी पडणार्‍या शस्त्र-साहित्याचे पूजनसह सोन्याचे झाडाचे आरती,कुंकूम तिलक करीत औक्षण केले.

Tags:
नंदुरबार

पूरग्रस्तांना अक्कलकुवा लायन्स क्लब मदतीचा हात

Share

अक्कलकुवा :- प्रतिनिधी

गेल्या बुधवारी व गुरुवारी अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गुजरात राज्यातील झुमुकटी येथील पूरग्रस्तांना अक्कलकुवा लायन्स क्लब मदतीचा हात दिला आहे.

गेल्या बुधवारी व गुरुवारी अक्कलकुवा सह सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस पडला. त्यामुळे सातपुड्यातून उगम पावणाऱ्या सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहिल्या. त्यामुळे अक्कलकुवा शहरापासुन केवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुजरात राज्यातील झुमुकटी या गावाला देखील जबर फटका बसला. अक्कलकुवा शहरालगत वाहणारी वरखेडी नदीच्या अगदी सपाट किनाऱ्याजवळ झुमुकटी हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावातील नदीशेजारी असणाऱ्या सुमारे 63 कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य वाहुन गेले. काही घरांची पडझळ झाली तर मध्य रात्री घरात पाणी शिरल्याने गावातील घरां मध्ये 4 फुट उंचीपर्यंत मातीचा गाळ साचला होता. परिणामी येथील नागरिकांकडे कपडे, अंथरुण पांघरूण तसेच विविध संसारोपयोगी साहित्याची उपलब्धता नव्हती म्हणून अक्कलकुवा येथील लायन्स क्लबने या सर्व पूरग्रस्तांना साड्या, कपडे, शाली, चादर, व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

गुजरातचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. तुषार चौधरी, निझरचे आमदार सुनिल गामीत, जिल्हा पंचायतचे सदस्य इकबालसिंग वसावा,यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी शंकर पाडवी साजन वळवी, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.उदय आगीवाल, उपाध्यक्ष रतनलाल गुलेच्छा, कोषाध्यक्ष डॉ.योगेश कुलकर्णी,लायन डॉ.संजय कोठडीया, लायन सुरेश तंवर, लायन सुरेश जैन, पत्रकार सुधिरकुमार ब्राम्हणे, शुभम भन्साली, लायन कपिल वाणी, लायन इमरान पठाण, लायन मनोज डागा आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!