सारंगखेडा चेतक महोत्सवाला भेट देणार जपानचे शिष्टमंडळ

0

नंदुरबार, ता. १ : नंदूरबारमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सारंगखेडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,या महोत्सवाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जागतिक स्तरावर नेण्यासाठी जपान सरकारला निमंत्रण दिले होते. त्यानुसार जपान सरकारचे शिष्टमंडळ रविवारी दि 3 रोजी सारंगखेडा येथे दाखल होणार आह.

दरम्यान, अश्वबाजारात हजारो अश्व दाखल झाले आहेत,  हा बाजार देशातील सर्वात मोठ्या अश्वबाजारांपैकी एक आहे. महाराष्ट्राचे पर्यटन आणि (रोहयो) मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.  या वेळी वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंटचे श्री. योशियो यामाशिता, वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्न्मेंटच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे श्री. ओनिशी तात्सुनोरी आणि इतर जपानी मान्यवर उपस्थित राहतील या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक, देशभरातील आणि परदेशातील पर्यटक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

सारंगखेडा चेतक महोत्सव २०१७ साठी देशभरातील विविध भागांतून घोडे सहभागी झाले होत असतात, या ठिकाणी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, अफगाणिस्तान आणि गुजरात इत्यादी भागांतून आलेल्या घोड्यांचे प्रदर्शन असते, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी प्रचंड संधी आहेत आणि सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक संधी आहे.

हॉर्स शोसारख्या कलाप्रकारांपासून क्रीडा व नृत्यसादरीकरणांपर्यंत विविध कार्यक्रमांचा या महोत्सवात समावेश आहे. हा ३१ दिवसांचा महोत्सव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. या माध्यमातून येथील कला, संस्कृती आणि विविध पैलू यावर प्रकाश टाकणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

या महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार करण्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल, एमटीडीसी आणि महोत्सवाच्या आयोजकांनी नंदूरबारसाठी वेबसाईट तयार केली आहे, एक मोबाईल अॅप्लिकेशनही विकसित केले आहे आणि या भागात येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळावी या हेतूने एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे

या संदर्भात श्री रावल म्हणाले, “ सारंगखेडा चेतक महोत्सव ही ३०० वर्षांपासून आयोजित होत असलेली जत्रा आहे, पण इतकी वर्ष हा महोत्सव दुर्लक्षित राहिला आहे. पण आता पायाभूत सुविधांचा विकास, मार्केटिंग आणि ब्रँडिंग करून हा महोत्सव जगाच्या नकाशावर नेण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे अश्व संग्रहालय बांधण्याची आमची योजना आहे. या संग्रहालयात पर्यटकांना घोड्यांचा वंश, त्याचे गुणधर्म, रंग, खुणा, आयुर्मान इत्यादींविषयी जाणून घेता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून नंदूरबार जिल्ह्याचा आर्थिक विकास व्हावा आणि पर्यटकांचे प्रमाण वाढावे ही महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि एमटीडीसीची अपेक्षा आहे.’’

LEAVE A REPLY

*