Video # ब्राम्हण पुरीच्या सुसरी नदी ला अचानक पूर : नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी

0

ब्राम्हणपुरी :- सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यातून वाहणारी सुसरी नदी ला भर उन्हाळ्यात गुरुवारी अचानक पूर आल्याने ब्राम्हणपुरी येथील नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.

शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरात गूरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वेगवान वारे सुरू झाले त्याच बरोबर तूळटक पावसाला सुरुवात झाली .उकाळ्याने हेरान नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला.परंतु शेतकरी वर्ग मध्ये भीती चे वातावरण झाले होते.परिसरात गहू हरभरे कापून शेतात काढणीवर आलेले पीक,केळी, पपई धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत होती.त्यातच गृहिणीची देखील तारबंद उडाली होती .
सुसरी धरणाची पाणी पातळी खालावत असल्याने पाण्याचा समस्यला सामोरे जावे लागनार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्ग मधे उमटत होते. परंतु अचानक सुसरी नदीला आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात होते.

सुसरी नदी ला पूर पाहण्यासाठी अबाल वृध्द सह नागरिकांनी देखील एकच गर्दी होत होती .पूर आल्याने कुंपण नलिकेची पाणी पातळी वाढवण्यास मदत होईल.

सुसरी नदीला आलेल्या पुराचा हा व्हिडीओ पहा

 

( व्हिडीओ संकलन : भूषण खैरणार, देशदूत डिजीटल )

 

LEAVE A REPLY

*