Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारभयंकर गुढ आवाजाने नंदुरबार हादरले

भयंकर गुढ आवाजाने नंदुरबार हादरले

नंदुरबार | प्रतिनिधी –

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक स्फोटसदृष्य गुढ आवाज येवून अनेक घरे हादरली.  तसेच सोबतच विमानाचाही आवाज आल्यामुळे अनेक नागरिकांनी भयभीत होवून घराबाहेर पडले. मात्र, हा आवाज ओझर मिग या लढावू विमानांचा सुपर सोनीक बुम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक मोठा स्फोटसदृष्य आवाज झाला. हा आवाज झाल्याबरोबरच अनेक घरे हादरली तसेच काही घरांच्या काचा फुटल्या. त्यानंतरच लगेचच विमानाचाही आवाज आल्याने नागरिक भयभीत झाले. हा आवाज कसला होता, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण  झाला होता. हा आवाज जिल्हयातील नंदुरबार, नवापूर, तळोदा, खांडबारा  परिसरातही झाला होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होे.

दरम्यान, नाशिक येथील ओझर मिग कंपनीच्या लढावू विमानांची चाचणी सुरु आहे. सदर विमानांचा वेग हवेच्या वेगापेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या वेगामुळे ध्वनीलहरी वेगात जमिनीवर येवून मोठा स्फोटसदृष्य आवाज होत असतो. त्यालाच सुपर सोनीक बुम म्हटले जाते. आज दुपारी नंदुरबारातून असे लढावू विमान गेल्याने त्याचा मोठा स्फोटसदृष्य आवाज झाला होता. मात्र, या आवाजामुळे अनेक घरे हादरली तसेच घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या आवाजामुळे अफवांचे पेवही फुटले.  विमानाचा स्फोट तसेच भुकंप झाल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या