Type to search

नंदुरबार

नंदुरबार : महिलेवर बलात्कार, एकाविरुद्ध गुन्हा

Share

नंदुरबार | प्रतिनिधी-

महिलेच्या पुतणीशी विवाह करण्याच्या अनुषंगाने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तळोदा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील प्रशांत दिलीपसिंग जोहरी (२८) याने फिर्यादी महिलेच्या पुतणीशी विवाह करण्याच्या अनुषंगाने ओळख प्रस्थापित केली. वेळोवेळी मोबाईलवर संपर्क साधून त्याच्या तळोदा येथील घरी घेवून वेळोवेळी जबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच शहादा येथील लोणखेडा रस्त्यावरील एका लॉजमध्ये नेवून त्या महिलेशी जबरीने संबंध ठेवला.

याबाबत कोणास काही सांगितल्यास त्या महिलेच्या मुलाला जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!