Type to search

नंदुरबार

ट्रकमध्ये कोंबून उंटांची अवैध वाहतूक

Share

नंदुरबार । राजस्थानमधून सोलापूरकडे उंटाची अवैध आणि क्रुर पद्धतीने वाहतूक करणार्‍या दोघांना नवापूर पोलीसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे. 18 उंटांसह ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानमधील पुष्कर येथून ट्रकमधून सोलापूर येथे उंटांची वाहतूक केली जात होती. सदर ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये तब्बल 18 उंट अतिशय क्रुर पद्धतीने कोंबुन भरण्यात आले होते. विशेष म्हणजे या ट्रक चालकाकडे उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे सदर ट्रक पोलीसांनी नवापूर पोलीस स्टेशनला जमा केला. ट्रक सोबत दोघांना ताब्यात घेतले आहे.  याबाबत पोलीस सखोलची चौकशी करत असून नेमकी या उंटाची वाहतुक अशा पद्धतीने का केली जात होती? याबाबत माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

नवापूर महामार्ग क्रमांक सहावर राजस्थान राज्यातील पुष्करहून सोलापूर येथे उंटाची वाहतूक विना परवाना व कोंबून घेऊन जात असल्याने उंटानी भरलेले ट्रक प्राणीमित्र आणि पोलिसांनी पकडला. या कारवाईत उंटाची तस्करी करणार्‍या आंतरराज्यीय टोळी आहे का? याचा तपास नवापूर पोलिस करीत आहे. नवापूर येथील प्राणीमित्र अक्षित अग्रवाल व नीरज अग्रवाल हे गुजरात राज्यातील सोनगड येथे मोटरसायकलीने जात असतांना नागपूर-सुरत महामार्गावरील रोकड्या हनुमान मंदिराजवळून ट्रक क्रमांक (आरजे 14 जी एच 9572) सुरतकडून धुळ्याकडे जात असतांना यात 18 उंट दाटीवाटीनी भरलेले दिसले. पोलीसांनी तपास केला असता ट्रक चालकांकडे वाहतूकीचा परवाना नव्हता.त्यामुळे प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबिंब अधिनियम व मोटरवाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेऊन चालक खालीद मामला (वय 28 रा. रिठाठ तालुका फिरोजपूर जिल्हा नुह (हरियाणा) व सलमान फरमान कुरेशी वय 18 रा खेतीपूरा मोहल्ला, वार्ड क्रमांक 21 जिल्हा बागपथ उत्तर प्रदेश यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राण्यांची क्रुरपणे वाहतूक केली जात असल्याने वन्यप्रेमीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!