Type to search

नंदुरबार

बालदिनीच बालकांचा मोर्चा

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव,अक्कलकुवा व शहादा तालुक्यातील नर्मदा नवनिर्माण अभियान संचलित नर्मदा जीवनशाळेचे विद्यार्थी, शिक्षकांसह पालक व गावकर्‍यांनी आज बालदिनाच्या दिवशी जीवनशाळेच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचला.

बाल दिवसानिमित्त जीवन शाळेच्या बालकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया मोर्चा काढला. सुरुवातीला तालुका क्रीडा संकुल येथून मोर्चास सुरुवात झाली. त्यांनतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे.की, आज बालदिन म्हणजेच चाचा नेहरू यांचा जन्मदिवस. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून चाचा नेहरूंनी कायमच आपल्या विकास कार्यात बाल कल्याण उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. हा दिवस.बालकांनाही सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले पाहिजे, त्यांनाही त्यांचे हक्क, अधिकार, प्राप्त करण्यासाठी मोठ्या संधी, समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. असे असले तरी आम्ही सर्व आदिवासी मुले-मुली मात्र विपरीत परिस्थितीत शिकत आणि जगत आहोत.आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाही?

आमची शाळा यापूर्वी सरकारनेच धरणात पाणी भरवून बुडविली, आजही आमच्या मणिबेली, डनेल, थुवाणी, सावर्‍यादिगर जीवनशाळेत खूप जवळ पाणी आहे, रोजच अंघोळीला जाताना पाण्याची, सापाची, मगरीची भिती वाटते. थुवाणी जीवनशाळेतील दोन मुले सर्पदंशाने मरण पावली. एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मणिबेली शाळेतील सोलार पंप बंद पडून 2 वर्ष झाले, तरीहीतो दुरुस्त झाला नाही.  अशा कितीतरी समस्यांच्या विळख्यात आहे.आम्हाला आमच्याच गावात सर्व सोयींयुक्त शिक्षण मिळावे. आम्हाला सरकारी शाळांप्रमाणे जीवनशाळांना सर्व शिक्षा अभियान लागू करावे, मध्यान्ह भोजन, वह्या,पुस्तके मिळावीत. आम्हाला जीवनशाळांकरिता सरकारी दरात धान्य मिळावे. आमच्या जीवनशाळेचे जागेचे सपाटीकरण करून शाळेपर्यंत जायला रस्ता करून मिळावा,घाट बांधून मिळावे. जीवनशाळेकरिता पक्की इमारत बांधून मिळावी. आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई मिळावी. सर्व शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आदिवासी विकास विभागामार्फत सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

निवेदनावर ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, पंडित वसावे, दिनेश पाडवी, चेतन साळवे, लतिका राजपूत, पुण्या वसावे, मेरसिंग पावरा, सजेंद्र पावरा, मांगू पावरा, राजेश वसावे, गौतम वळवी, सतरसिंग पावरा, किरसिंग वसावे, रूमालसिंग पावरा, कृष्णा पावरा, किर्ती वसावे, गणेश वसावे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!